एक्स्प्लोर
Chakka Jam Aganist Shakti Peeth expressway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या एल्गार; कोल्हापुरातून पुणे, सांगली, बेळगावकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक मार्गात मोठा बदल
Shakti Peeth expressway: उद्या सकाळी आठ वाजल्यापासून किंवा महामार्ग रोको आंदोलन सुरु झाल्यापासून ते चक्का जाम आंदोलन संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.

Shakti Peeth expressway
Source : facebook
Shakti Peeth expressway: शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या (1 जूलै) कोल्हापुरात एल्गार करण्यात येणार आहे. इंडिया आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटनांकडून पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलावर रास्ता रोको करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांकडून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. उद्या सकाळी आठ वाजल्यापासून किंवा महामार्ग रोको आंदोलन सुरु झाल्यापासून ते चक्का जाम आंदोलन संपेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.
कोल्हापुरात वाहतूक मार्गात करण्यात आलेला बदल
- कागल, लक्ष्मी टेकडी, तावडे हॉटेल, सांगली फाटा मार्गे पुणे कडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना लक्ष्मी टेकडी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी लक्ष्मी टेकडी, फाईव्ह स्टार एमआयडीसी, हुपरी, इचलकरंजी, हातकणंगले, वडगांव, वाठार ब्रिज मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- कागल, लक्ष्मी टेकडी, तावडे हॉटेल, सांगली फाटा मार्गे पुणेकडे जाणाऱ्या जड-अवजड व सर्व वाहनांना उजळाईवाडी ओव्हरब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी शाहु टोल नाका, हायवे कॅन्टीन चौक, ताराराणी चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, कसबा बावडा, शिये फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- किणी टोल नाका-वाठार फाट, टोप, सांगली फाटा मार्गे सांगलीकडे जाणाऱ्या जड-अवजड व सर्व वाहनांना वाठार ब्रिज (शेर-ए-पंजाब धाबा) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी वाठार ब्रिज, वडगांव, हातकणंगले मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- किणी टोल नाका-वाठार फाट, टोप, सांगली फाटा मार्गे कागलकडे जाणाऱ्या जड-अवजड व सर्व वाहनांना शिये फाटा (हॉटेल धनराज समोर) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी शिये फाटा, कसबा बावडा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, ताराराणी चौक, कोयास्को चौक, उंचगांव ब्रिज अगर सरनोबत वाडी ब्रिज अगर शाहु टोल नाका मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- गांधीनगरकडून तावडे हॉटेल ब्रिज खालुन सांगली फाट्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना तावडे हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी ताराराणी चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, कसबा बावडा, शिये फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- सांगली फाट्याकडून तावडे हॉटेलकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना सांगली फाटा ब्रिज खाली प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी शिरोली एमआयडीसी, कसबा बावडा, पोलीस अधीक्षक कार्यालय चौक, ताराराणी चौक मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- सांगली, हातकणंगले, सांगली फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन कागल बेळगांवकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना इचलकरंजी फाटा हॉटेल कॅसल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी इचलकरंजी फाटा, कबनूर मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
- सांगली, हातकणंगले, सांगली फाटा मार्गे राष्ट्रीय महामार्गावरुन पुणेकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना हातकणंगले एस.टी. स्टॅन्ड समोर येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. सदर वाहनांनी हातकणंगले, वडगांव, वाठार ब्रिज मार्गे पुढे सोयीनुसार मार्गस्थ व्हावे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम
























