Raju Shetti: शक्तीपीठ रत्नागिरी-नागपूर महामार्गास समांतर, तरीही 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठी या महामार्गाचा अट्टाहास; राजू शेट्टींचा मॅप दाखवत हल्लाबोल
Raju Shetti on Shaktipeeth Experessway: शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी, साखर कारखानदारांनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही असा इशारा दिला आहे.

Raju Shetti on Shaktipeeth Experessway: शक्तिपीठ महामार्गाला कॅबिनेट मंजुरी देण्यात आल्यानंतर राज्यांमध्ये एल्गार सुरूच आहे. शक्तिपीठ महामार्ग विरोधात शेतकरी संघटनांसह राजकीय पक्षही एकवटले आहेत. या महामार्गाला कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह 12 जिल्ह्यातून कडाडून विरोध सुरूच आहे. मात्र, सरकारकडून शक्तीपीठ होणारच अशी भूमिक भूमिका घेतली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उद्या (1 जुलै) शेतकरी दिनी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील पंचगंगा पुलावर रास्ता रोको आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये हजर आणि संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
महाराष्ट्रातील जनतेवर ८६ हजार कोटीचा बोजा टाकणारा शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी -नागपूर या महामार्गास समांतर आहे. या दोन्ही महामार्गातील कमीत कमी अंतर २ कि. मी. व जास्तीत जास्त अंतर ३० कि. मी. आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातून जाणारे दोन्ही महामार्ग कसे समांतर आहेत
— Raju Shetti (@rajushetti) June 30, 2025
साखर कारखानदारांनी शक्तीपीठ विरोधी भूमिका स्पष्ट करावी
दरम्यान शेट्टी यांनी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तसेच साखर कारखानदारांनी शक्तीपीठ विरोधी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही असा इशारा दिला आहे. तुमच्या मिशीला खरकटं लागलं नसेल तर तुम्हाला सरकारला घाबरण्याची काहीच गरज नाही. निवडणुकीपूर्वी तुम्ही या संदर्भात पत्र दिले होते आणि आता तुम्ही भूमिका स्पष्ट करत नसल्याकडे राजू शेट्टी यांनी लक्ष वेधलं. राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्ग 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच असल्याचा आरोप केला.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व विशेषता साखर कारखानदारांनी शक्तीपीठ विरोधी भुमिका स्पष्ट करावी अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही .
— Raju Shetti (@rajushetti) June 30, 2025
उद्या १ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पुणे -बेंगलोर महामार्ग पंचगंगा पूल शिरोली याठिकाणी सर्वजण हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे pic.twitter.com/GNDNFwzrzm
शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी?
राजू शेट्टी यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की महाराष्ट्रातील जनतेवर 86000 कोटींचा बोजा टाकणारा शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी नागपूर महामार्गास समांतर आहे. या दोन्ही महामार्गातील कमीत कमी अंतर दोन किमी व जास्तीत जास्त अंतर तीस किमी आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातून जाणारे दोन्ही महामार्ग कसे समांतर आहेत हे या नकाशावरून दिसून येईल. भविष्यात गरज पडल्या सध्या असणारा रत्नागिरी नागपूर महामार्ग चौपदरी, सहा पदरी किंवा आठ पदरीकरण सहज शक्य असताना शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी? 50 हजार कोटींचा ढपला पाडण्यासाठीच असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























