Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मुंबईत गेल्यावर छगन भुजबळांशी बोलणार, आक्रमक भूमिकेनंतर अजित पवारांकडून सावध पवित्रा
Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलू. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही, मुंबईत गेल्यावर बोलीन, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
![Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मुंबईत गेल्यावर छगन भुजबळांशी बोलणार, आक्रमक भूमिकेनंतर अजित पवारांकडून सावध पवित्रा cautious attitude from Ajit Pawar on Chhagan Bhujbal aggressive stance says when goes to Mumbai will talk to him Ajit Pawar on Chhagan Bhujbal : मुंबईत गेल्यावर छगन भुजबळांशी बोलणार, आक्रमक भूमिकेनंतर अजित पवारांकडून सावध पवित्रा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/01/29/21d7e1f10a53a9cdb883c6084fbefd201706513828890736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापूरचा (Kolhapur News) दसरा महोत्सव किमान 10 दिवस चालावा यासाठी नियोजन केलं जाणार आहे, कोल्हापुरात या निमित्ताने 10 दिवस चांगलं वातावरण निर्माण होईल, काळम्मावाडी धरणाच्या गळतीचे काम पावसाळ्याच्या आत करावं लागणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले. अजित पवार आज (29 जानेवारी) कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांनी आज (29 जानेवारी) सकाळी गंगावेश तालमीची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले.
वाचाळवीर लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला फसवल्याची टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना विरोध करणारा मंत्री बरखास्त करा, असेही त्यांनी म्हटले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाचाळवीर लोकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास मी बांधील नाही, असे प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, सरकारची कोणतीही मिलीभगत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली आणि मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण दिलं जाणार हे मुख्यमंत्र्यांनी म्हटल आहे. घरातील दोन भावांमध्ये देखील वाद होतात मात्र त्यावर बसून मार्ग काढतात. मराठा आरक्षणबाबत काही जणांना हे थांबावं असं वाटत नसावं. म्हणून जण काही जण बोलत असतील त्यांना वेदना होत असतील. हा असा म्हटला तो तसा म्हटला या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाही, असे म्हणत अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिले.
मराठ्यांना देण्यात आलेल्या अध्यादेशावर बोलताना अजित पवार म्हणाले की, काल प्रफुलपटेल साहेब यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे. कोणत्याही समाजाला नाराज करून चालत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन सांगितलं आहे. मी, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस एकत्र बसून भुजबळ यांच्याशी बोलू. कुणालाही दुखावण्याचा आमचा हेतू नाही, मुंबईत गेल्यावर बोलीन, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.
आम्ही आमचे काम करत राहणार
ते पुढे म्हणाले की, विरोधकांना टीका करण्याशिवाय आता दुसरं काही काम राहिलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी काम केलं आहे. विरोधकांमध्ये एकी राहिली नाही ममता बॅनर्जी अखिलेश यादव हे आता वेगळी भूमिका मांडत आहेत. विरोधकांनी टीकाटिप्पणी करत बसावं आम्ही आमचे काम करत राहणार असल्याचे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)