(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अमोल मिटकरींनी सभेला भाडोत्री माणसे आणली म्हणताच प्रवीण दरेकरांचा तीळपापड; थेट xxxx म्हणत शिवी हासडली
मिटकरी यांनी अकोल्यात भाजपच्या सभेला 300 रुपये हजेरी देत भाडोत्री माणसे आणल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा मिटकरी यांच्या गंभीर आरोपांना उत्तर संयम सुटला अन् शिवीही हासडली.
Amol Mitkari Vs Pravin Darekar: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यातील भाजपच्या सभेला 300 रुपये हजेरी देत भाडोत्री माणसे आणल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा मिटकरी यांच्या गंभीर आरोपांना उत्तर संयम सुटला अन् शिवीही हासडली. दुसरीकडे, आमच्यावर पक्षाचे संस्कार झाले आहेत. त्यामुळे आम्ही इतरांवर एकेरी टिका करीत नाही. मुनगंटीवार, राणेंची दोन पोरं, पडळकर काय बोलतात ते पहा, राजकारणाचा स्तर भाजपनं घालवला असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला.
अमोल मिटकरी काय म्हणाले?
भाजपच्या आजच्या अकोल्यातील सभेसाठी 300 रूपये मजुरीने माणसं आणली जात असल्याचा गंभीर आरोप अमोल मिटकरी यांनी केला. ते अकोलामध्ये 'एबीपी माझा'शी बोलत होते. मिटकरी म्हणाले की, भाजपनं अकोल्यात येऊन नरेंद्र मोदींच्या 9 वर्षांचा हिशेब देण्यापेक्षा अकोल्यातील भाजपच्या 25 वर्षांच्या राजवटीचा हिशेब द्यावा. अकोल्यात भाजपच्या राजवटीतील 25 कामं दाखवावीत, आपण आयुष्यभर भाजपची गुलामगिरी करू. भाजपच्या कार्यालयात झाडपुस करू. मिटकरी पुढे म्हणाले की, अकोला क्राईम कॅपिटल होत असतांना पालकमंत्री देवेंद्र फडणवीस अकोल्यात का आले नाहीत? पारसची दुर्घटना, दंगल, अवकाळी पाऊस यासह अनेक घटना घडल्या असताना न येणारे फडणवीस आज भाजपच्या सभेसाठी येत आहेत.
मिटकरींवर टीका करतांना दरेकरांची जीभ घसरली
अमोल मिटकरी यांनी केलेल्या टीकेनंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांची जीभ घसरली.अकोल्यात भाजपनं भाडोत्री गर्दी जमविल्याचा आरोप करणाऱ्या मिटकरींवर टीका करताना असंसदीय भाषेत शिवी देत वादाला तोंड फोडले. xxखाऊ असा उल्लेख करत त्यांना वाद ओढवून घेतला. दरेकर म्हणाले की, महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी आम्हालाही तितकंच प्रेम आहे. त्यावर आम्हाला कुणी शिकवू नये.
संजय राऊतांना फटकारले
संजय राऊत हे विझता दिवा आहे. त्यामुळे फडफडत्या दिव्याला भाजपचं संरक्षण हवं असेल. उद्धव ठाकरेंना भाजपत घ्यायचं की नाही आम्ही ठरवू? चलबिचल संजय राऊत यांच्या मनात असेल. राऊतांनी आपला रसातळाला जाणारा पक्ष सांभाळावा. त्यांनी पक्ष संपवण्याची सुपारी घेतली आहे का? राऊतांना ई (एकनाथ) डी (देवेंद्र) यांची प्रचंड भिती आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी विचारधारा सोडली. आधी प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेबाच्या मजारीवर जाण्यावर भूमिका स्पष्ट करावी, असा टोलाही दरेकरांनी लगावला.
इतर महत्वाच्या बातम्या