महाविकास आघाडीत बिघाडी? संजय राऊतांची स्वबळाची घोषणा, शरद पवार अन् अजित पवार म्हणाले
Sanjay Raut News : खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत शक्य आहे तोपर्यंत राहू त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं शिबिरात जाहीर भाषण करताना बोलले.
Sanjay Raut News : महाविकास आघाडीत बिघाडी? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. कारण खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत शक्य आहे तोपर्यंत राहू त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं शिबिरात जाहीर भाषण करताना बोलले..तर सामनामध्ये तर दुसरीकडे आमचं मोदी शाह यांच्याशी आमचं भांडण नसल्याचं म्हणत पुन्हा एकदा भाजप नेतृत्वाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न साधला आहे. त्यामुळे ठाकरे गट महाविकास आघाडीत राहणार की पुन्हा जुन्या युतीत सहभागी होणार या चर्चांना वेग आला आहे. संजय राऊतांच्या स्वबळाच्या नाऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते ?
शिवसेनेच्या राज्यव्यापी शिबीरात बोलताना संजय राऊत यांनी महाविकास आघाडीवरही भाष्य केलेय. आता सगळे भावी मुख्यमंत्री समोर येताय. या भावी मुख्यमंत्र्याचा पीक आलाय. माझ्यासमोरही एक भावी मुख्यमंत्री आहेत. आपण राहू महाविकास आघाडीमध्ये जोपर्यत आहोत तोपर्यंत. ज्यावेळी निर्णय घ्यायचा तेव्हा घेऊ. विद्यामान मुख्यमंत्री समोर आहेत, कोर्ट काय म्हणाल होत आम्ही पुन्हा उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं असते, असे संजय राऊत म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले ?
आमच्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार आहे, हा विषय आज आमचा नाहीच. आज हे राज्य आणि देश पातळीवर भाजपला दूर कसं करता येईल, यावर अधिक लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यामुळं आज राज्यात कोण येईल, हा विषय सध्या नाही, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले ?
त्यांचा पक्ष वाढवण्याचा त्यांना अधिकार आहे. तीन पक्ष एकत्र आल्याशिवय आम्ही शिंदे आणि भाजपचा मुकाबला करु शकत नाही. हेच संजय राऊत मागे म्हणाले होते की आमची आघाडी 25 वर्षे टिकणार आहे. त्यावेळी त्यांना आघाडी 25 वर्ष टिकेल असे वाटतं होते पण आता त्यांना एकट्याचे सरकार यावं अस वाटत असेल तर चुकीचे काय आहे ? काहीतरी ध्येय डोळयासमोर ठेवून वाटचाल करीत असतो आणि ती इच्छा त्यांनी बोलून दाखवली, त्यांना आमच्या शुभेच्छा, असे अजित पवार म्हणाले.
प्रविण दरेकर काय म्हणाले ?
संजय राऊत हे विझता दिवा आहेत. त्यामूळे फडफडत्या दिव्याला भाजपचं संरक्षण हवं असेल असा टोला भाजपा नेते प्रविण दरेकर यांनी लगावलाय. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी बोलत होतेय.