Gokul Audit : गोकुळचे उद्यापासून चाचणी लेखापरीक्षण; शौमिका महाडिक यांनी केली होती तक्रार
Gokul Audit: राज्य लेखा परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार गोकुळच्या दूध संघाच्या चाचणी लेखा परीक्षण उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. चाचणी लेखा परीक्षण करण्यासाठी विशेष लेखापरीक्षक मसुगडे यांची नियुक्ती केली आहे.
Kolhapur Gokul Audit: राज्य लेखा परीक्षा मंडळाच्या आदेशानुसार गोकुळच्या दूध संघाच्या चाचणी लेखा परीक्षण उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. मंडळांने गोकुळचे चाचणी लेखा परीक्षण करण्यासाठी अहमदनगरचे विशेष लेखापरीक्षक मसुगडे यांची नियुक्ती केली आहे. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी लेखापरीक्षणाची मागणी केल्यानंतर हे चाचणी लेखापरीक्षण होत आहे. चौकशी आदेश देण्यात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु आहेत.
गोकुळ दूध संघाच्या चाचणी लेखा परीक्षणासाठी लागणारी कागदपत्रे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अहमदनगरचे विशेष लेखा परीक्षक बाळासाहेब मसुगडे यांनी गोकुळ प्रशासनाकडे यापूर्वीच (Gokul Milk) केली आहे. शासनाच्या आदेशाने चाचणी लेखा परीक्षणाचे काम आपण सक्षमपणे करू, असे त्यांनी म्हटले आहे.
गोकुळ दूध संघाच्या 2021-22 या आर्थिक वर्षाचे चाचणी लेखापरीक्षण करावे, अशी मागणी गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांनी कृषी पशुसंवर्धन व दुग्ध विभागाच्या लेखा परीक्षण मंडळाकडे केली होती. आदेश मिळाल्यानंतर लेखा परीक्षणासाठी आवश्यक ती कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत, असे गोकुळला मेल पाठवून कळवले असल्याचेही मसुगडे यांनी सांगितले होते.
चौकशी आदेशानंतर सतेज पाटील आणि महाडिक गट आमनसामने
गोकुळच्या (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील (Satej Patil) आणि विरोधी गटातील महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक (Shoumika Mahadik) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु झाले आहे. सतेज पाटील यांनी केवळ दोन वर्ष कशाला, 25 वर्षांचे लेखापरीक्षण करा, अशी टीका केल्यानंतर आता शौमिका महाडिक यांनीही जोरदार पलटवार केला. यानंतर शौमिका महाडिक यांनी तुम्हाला यापूर्वी कोणी रोखले होते? असा प्रतिसवाल केला होता. तसेच पत्रकार परिषद घेऊन सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते.
सतेज पाटलांचं नाॅलेज फक्त टँकर
शौमिका महाडिक म्हणाल्या की, "तुम्ही किती चौकशी लावल्या? 25 वर्षात 400 कोटींवरून उलाढाल 3 हजार कोटींवर गेली, यावरूनच कळेल हा ऑडिट लावायचं की नाही, त्यांची तुलना दोन वर्षात करा यांनी आयत्या पीठावर रेगोट्या ओढण्यापलीकडे काही केलं नाही. यांचं ओरिजनल असं काय आहे, दुसऱ्याने जमीन तयार करायची आणि यांनी फक्त पिकं घ्यायची. 400 कोटींवरून 3 हजार कोटींवर कसा आला, 13 ते 15 लाख लिटरवर कसा आला याची यांना काहीच माहिती नाही. माजी पालकमंत्र्यांना नाॅलेज फक्त टँकर, यांना बाकी काही माहीत नाही. टँकर हा एक विषय संपला की गोकुळमधील त्यांचं नाॅलेज संपलं, बाकी यांना काहीच माहीत नाही.
इतर महत्वाच्या बातम्या