एक्स्प्लोर

Hasan Mushrif : खासदारकीची निवडणूक लढवणार आणि केंद्रात मंत्रीही होणार; हसन मुश्रीफ यांनी सांगितला राजकीय प्लॅन

Hasan Mushrif: आमदार हसन मुश्रीफ यांनी आगामी निवडणुकीवरून भाष्य केलं आहे. कागलमध्ये महामेळाव्यात हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या हस्ते 16000 वैद्यकीय विमा सुरक्षा कार्डचे वाटप करण्यात आले.

Hasan Mushrif : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आगामी निवडणुकीवरून भाष्य केलं आहे. कागलमध्ये (Kagal) महामेळाव्यात हसन मुश्रीफ यांच्या हस्ते 16000 वैद्यकीय विमा सुरक्षा कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय वाटचालीवर भाष्य केले. 

हसन मुश्रीफ म्हणाले की, कागल विधानसभा मतदारसंघातून अजून दोनवेळा निवडणूक लढवणार आहे, त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री होणार आहे. ते पुढे म्हणाले की, श्रीमंत आणि गरीबांमधील दरी रुंदावत चालली आहे. गरिबांची सेवा गेल्या 30 वर्षापासून अखंडपणे आम्ही करत आलो आहे. गरिबांशी माझी नाळ तुटलेली नाही. विधानसभेच्या आणखी दोन निवडणुकीत विजयी होणार आहे आणि त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवून केंद्रात मंत्री देखील होणार आहे. लोकांची शक्ती जोपर्यंत माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत कोणालाही घाबरत नाही. ज्या ज्या शासकीय योजना आहेत, त्या गरीबांसाठी राबवण्याचा प्रयत्न केल्याचे ते म्हणाले. 

हेमांडपंथी अंबाबाई मंदिराने मुरगूडच्या वैभवात भर

दरम्यान, मुरगुड ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक पुण्यनगरी आहे. या शहराच्या वैभवात भर टाकणारे  ग्रामदैवत अंबाबाई मंदिर पूर्णत्वाला गेले ही शहरवासीयांसाठी सुखद गोष्ट आहे. या मंदिरासाठी मागेल तितका निधी आपण दिला आहे. यापुढेही लागेल तितका निधी देऊ, अशी ग्वाही हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. ते म्हणाले, लोकवर्गणी आणि सरकारी निधी यातून हे मंदिर शिल्पकलेच्या कोरीव दगडी लेण्यासारखे आहे. जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या नकाशावर हे मंदिर एक सुंदर तीर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध होईल. या मंदिराच्या बांधकामामध्ये मंत्रीपदाच्या काळात पर्यटन विकास आणि तीर्थस्थळ विकास योजनेतून अडीच कोटीहून अधिक निधी आणू शकलो, याचे आत्मिक समाधान आहे. 

गोकुळ लेखापरीक्षणावर हसन मुश्रीफ म्हणतात...

दरम्यान 'गोकुळ'मध्ये (Gokul) चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश देण्यात आल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडूनही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सत्ताधारी आघाडीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी निर्णयाचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळमध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आबिटकर, यांच्या गटाचे संचालक असतानाही गोकुळमध्ये चाचणी लेखापरीक्षण लागत असल्यास त्या निर्णयाचे स्वागत आहे. मुश्रीफ पुढे म्हणाले की, गोकुळ निवडणुकीत दूध दरात दोन रुपयाची दरवाढ करू अशी आम्ही घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात आठ रुपये दरवाढ देण्यात आली आहे. प्रति लिटरला चारपट दरवाढ देण्यात आली.  

गेल्या दीड वर्षांपासून अतिशय काटकसरीने आणि पारदर्शक कारभार सुरू आहे. गोकुळमधील उपपदार्थांमध्ये फायदा होत नव्हता. सध्या मात्र कोट्यवधी रुपयांचा फायदा होत आहे. खर्चावर सर्व बाजूंनी मर्यादा घालण्यात आली आहे. पारदर्शी आणि  काटकसरीने संघ फायद्यात आल्याचे दिसून येत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Gokul : गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget