![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shivsena Maha Adhiveshan : श्रीकांतचं भाषण होताच, त्याच्या आणि माझ्या डोळ्यात अश्रू, शिवसेना कुटूंबही पुरते हेलावून गेले : एकनाथ शिंदे
श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झाल्याचे ते म्हणाले.
![Shivsena Maha Adhiveshan : श्रीकांतचं भाषण होताच, त्याच्या आणि माझ्या डोळ्यात अश्रू, शिवसेना कुटूंबही पुरते हेलावून गेले : एकनाथ शिंदे As soon as Srikanth' speech was delivered tears came to his eyes and mine even the Shiv Sena family get emotional says eknath shinde Shivsena Maha Adhiveshan : श्रीकांतचं भाषण होताच, त्याच्या आणि माझ्या डोळ्यात अश्रू, शिवसेना कुटूंबही पुरते हेलावून गेले : एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/16/a182168f6940a058a10a3ec373de09311708104750369736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले. यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात महा अधिवेशनात दिली.
सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला. त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो. नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले. आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटूंबही पुरते हेलावून गेले.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
यावेळी माझ्या प्रत्येक सुखदुःखात सोबत असलेले माझे कुटूंबीय माझे… https://t.co/E5WkyNQFcU pic.twitter.com/rQxAGG965l
एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, 'शिवसेना' या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात मांडले.
शिवसेना हेच माझं सर्वस्व होतं, शिवसैनिक हेच माझं कुटूंब होतं. आयुष्यभर मी त्यांच्यासाठी काम केलं पुढे काय होईल याची मला अजिबात कल्पना नव्हती नेहमी पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधी पाहिले नव्हते. पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला. pic.twitter.com/lreROUxLHX
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
'शिवसेना' या चार अक्षरी मंत्राचा जयघोष करत पक्षासाठी मी माझी वाटचाल सुरू केली होती. किसन नगरच्या दहा बाय दहाच्या एकत्रित कुटूंबातून सुरू झालेला माझा प्रवास अथक प्रयत्न आणि परिश्रमाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत कसा येऊन पोहोचला ते श्रीकांतने आपल्या भाषणातून अगदी समर्पक शब्दात… https://t.co/fQTet7K5rG pic.twitter.com/bRH52jLOaK
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
#शिवसेना राज्यव्यापी महाअधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या सत्रात अनेक मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपली मनोगते मांडली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 16, 2024
अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा.मनीषा कायंदे, ज्येष्ठ पत्रकार संदीप आचार्य यांनी वैद्यकीय क्षेत्रात… pic.twitter.com/YTn0MzPD26
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)