#MaharashtraPoliticalCrisis : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता नॉट रिचेबल
कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक मोठा नेता नॉट रिचेबल झाले आहे. आज सकाळी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल झाले आहेत.
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या हादऱ्यानंतर शिवसेनेला अजून किती धक्के बसणार? याबाबत चर्चा अजूनही होत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एक मोठा नेता नॉट रिचेबल झाले आहे. आज सकाळी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल झाले आहेत.
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही दोन दिवसांपूर्वी क्षीरसागर यांना फोन करून चर्चा केली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या फोनाफोनीनंतर राजे क्षीरसागर शिंदे गटात गेल्याची चर्चा सुरु झाली आहे. अलीकडेच कोल्हापूर उत्तर निवडणुकीमध्ये दरम्यान उमेदवारी न मिळाल्याने क्षीरसागर नाराज होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर हे सुद्धा एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आहेत. विमानतळावरील समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ते कैद झाले होते. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकरही नॉटरिचेबल झाले होते. त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे असल्याचे स्पष्ट झाले.
दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील सेनेचे माजी आमदार उल्हास पाटील, सत्यजित पाटील, चंद्रदीप नरके, सुजित मिणचेकर यांनीही गोव्यात मुक्काम ठोकला आहे. यांच्यासोबत राजेश क्षीरसागरही होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Political Crisis : भाजपचा पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदेंनी केलं मान्य
- #MaharashtraPoliticalCrisis : एकनाथ शिंदेंच्या बंडाळीने महाविकास आघाडी सरकार गॅसवर, पण अजित पवारांकडून भाजपला क्लीन चिट!
- Maharashtra Political Crisis : अजित पवार काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास देत होते, पटोलेंच्या आरोपावर उपमुख्यमंत्री नाराज, म्हणाले...