(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर, 20 नोव्हेंबरला मतदान
अंतर्गत यादवीमुळे सातत्याने वादात असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर करण्यात आली. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अंतर्गत यादवीमुळे सातत्याने वादात असलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर करण्यात आली. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. 20 नोव्हेंबरला मतदान व 22 तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
निवडणूक समितीमध्ये पाच जणांचा समावेश आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲड. प्रशांत पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. निवडणूक समितीमध्ये अधिकारी म्हणून प्रताप वसंतसिंह परदेशी पुणे, आकाराम पाटील कोल्हापूर, शहाजीराव पाटील पुणे आणि सुनील मांजरेकर, मुंबई यांचा समावेश आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची मुदत संपून दीड वर्षे झाली, पण कोरोना आणि महामंडळातील अंतर्गत राजकारणामुळे निवडणूक लावण्यात आली नाही. मुदत संपल्यानंतर कार्यकारिणीकडून मेघराज यांना बाजूला करत बहुमताने सुशांत शेलार यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. त्यामुळे वाद विकोपाला गेला होता. याचा महामंडळाच्या कामावरही परिणाम झाला होता.
त्यामुळे कामकाज सुरळीत होण्यासाठी गेल्या महिन्यात सभासदांनी महामंडळावर मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मेघराज राजेभोसले, संजय ठुबे, ॲड. प्रशांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
- कच्ची मतदार यादी 27 सप्टेंबरला प्रसिद्ध होईल
- हरकती स्वीकारण्याचा कालावधी 27 ते 3 ऑक्टोबर
- अंतिम यादी 12 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर कार्यालयात जाहीर होणार
- अर्ज वाटप कालावधी 12 ते 15 ऑक्टोबर
- उमेदवारी अर्ज कोल्हापूरसह मुबंई, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर कार्यालयात उपलब्ध असतील
- अर्ज स्वीकारण्याचा कालावधी 17 ते 19 ऑक्टोबर
- 20 ऑक्टोबर रोजी अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार
- उमेदवार अर्ज छाननी 27 ऑक्टोबर
- 29 ऑक्टोबर पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार
- उमेदवारी मागे घेण्याचा कालावधी 29 ते 31 ऑक्टोबर
- चिन्हासह पात्र उमेदवरांची 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्द होणार
- 20 नोव्हेंबर रोजी मतदान
- 22 नोव्हेंबर रोजी कोल्हापूर कार्यालयात मतमोजणी
इतर महत्त्वाच्या बातम्या