Hiranyakeshi River : आणि कोरडी पडलेली हिरण्यकेशी नदी उलट्या दिशेने वाहू लागली !
पावसाने काही मिनिटांमध्ये रौद्ररुप धारण केल्यानंतर हिरण्यकेशी नदीचे पात्र पश्चिमेच्या दिशेने उलटे वाहू लागले. कोरड्या पडलेल्या नदी पात्राचा उलट दिशेचा प्रवास पाहून ग्रामस्थांनाही सुखद धक्का बसला.
Hiranyakeshi River : मोसमी पावसाने अजूनही हुलकावणी दिली असली, तरी कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी अचानक सरीवर सरी कोसळत आहेत. या अचानक सरी कोसळून कोरड्या पडलेल्या हिरण्यकेशी नदीचे पात्र उलट्या दिशेने वाहू लागले. पावसाने काही मिनिटांमध्ये रौद्ररुप धारण केल्यानंतर हिरण्यकेशी नदीचे पात्र पश्चिमेच्या दिशेने उलटे वाहू लागले. कोरड्य पडलेल्या नदी पात्राचा उलट दिशेचा प्रवास पाहून ग्रामस्थांनाही सुखद धक्का बसला.
सीमाभागात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांमध्येच धुमशान सुरु केल्यानंतर नांगनूर, संकेश्वर, अरळगंडी, हेब्बाळ, गोटूर, कमतनूर आदी भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पावसाची तीव्रता इतकी भयानक होती, की महामार्गावरील गडहिंग्लज पुलाखालून पाणी वाहू लागले. ओढ्यांमधील पाण्याचा लोटही नदीत येऊन मिळाले. तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा थेंबही नसल्याने, पण पूर्वेकडे झालेल्या मुसळधार पावसाने नदीचे पात्र अचानक वाहू लागले. त्यामुळे पूर्ववाहिनी हिरण्यकेशी नदी पश्चिमेकडे उलट दिशेने वाहू लागली.
कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही पावसाची प्रतीक्षा
कोल्हापूर जिल्ह्याला अजूनही मोसमी पावसाला सुरुवात झाली नसल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. पावसाने दडी मारल्याने केलेल्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत, तर सोयाबीन आणि भुईमुगाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिना संपत आला, तरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकड लागले आहेत. जिल्ह्यात पुढील पाच दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, काल कोल्हापूर शहरात पावसाने हजेरी लावली, पण त्याची तीव्रता नव्हती. गेल्यावर्षी याच दिवसांमध्ये जिल्ह्यातील ५८ बंधारे पाण्याखाली होते तर पाच मार्गावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या