(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
पत्की हॉस्पिटलसमोर रिक्षाच्या झालेल्या थरारक आणि विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. शनिवारी सकाळी नऊच्या सुमाराचा हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Viral Video) शहरातील शाहूपुरीमध्ये पत्की हॉस्पिटलसमोर रिक्षाच्या झालेल्या थरारक आणि विचित्र अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. काल (15 जून) शनिवारी सकाळी नऊच्या सुमाराचा हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. सुदैवाने रिक्षाच्या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी दोघेजण जखमी झाले आहेत. या संपूर्ण थरारक अपघाताचा अवग्या 30 सेकंदांमधील थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तो पाहताच अंगावर शहारे येतात.
व्हायरल व्हिडिओमध्ये पत्की हॉस्पिटलसमोर रिक्षा थांबलेली दिसून येते. रिक्षा चालक टर्न घेत डाव्या बाजून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच बरोबर रस्त्याच्या मध्यभागी येताच उजव्या बाजूने येणाऱ्या भरधा दुचाकीची धडक पहिल्यांदा त्या टर्न घेणाऱ्या रिक्षाला बसली. रिक्षाला दुचाकीने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघेजण रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या पार्किंग कारजवळ जाऊन कोसळले.
यानंतर रिक्षा नियंत्रित झालेली दिसून येत नाही. ती रिक्षा पुन्हा टर्न घेत पुन्हा 360 डिग्रीमध्ये वळण घेत रस्त्यावर आल्याचे दिसून येते. त्यानंतर रिक्षाच्या मध्ये येणाऱ्या एका महिलेला सुद्धा वाचण्याचा प्रयत्न एका पुरुषाकडून होतो. मात्र, एकमेकांना वाचवण्याच्या नादात त्यांनाही रिक्षाने धडक दिली. यावेळी ते दोघेही रस्त्यावर जोरदार कोसळले. यावेळी त्यांच्या बाजूने रिक्षा गेल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही. अवघ्या काही सेकंदामधील या अपघाताने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.
इतर महत्वाच्या बातम्या