Kolhapur Crime : पन्हाळा तालुक्यातील लष्करात कार्यरत असलेल्या अवघ्या तिशीतील जवानाची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच असून आता लष्करात कार्यरत असलेल्या जवानाने सुट्टीवर आल्यानंतर राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच असून आता लष्करात कार्यरत असलेल्या जवानाने सुट्टीवर आल्यानंतर राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात काखे गावामध्ये सत्यजीत खुडे या जवानाने घरीच आत्महत्या केली. जवानाने आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. सत्यजितच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. या घटनेची नोंद कोडोली पोलिस ठाण्यात झाली आहे. सत्यजितच्या टोकाच्या निर्णयाने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
सत्यजीत महादेव खुडे (वय 28) हा भारतीय सैन्यात कार्यरत होता. तो गेल्या काही महिन्यांपासून गुजरातमध्ये डी. रिगारमेंट या विभागात सेवा बजावत होता. 1 जानेवारीपासून तो आपल्या काखे गावी सुट्टीवर आला होता. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास सत्यजीत दुसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेला होता. दुपारी तीनच्या सुमारास भाऊ सुनील हा सत्यजीतला उठविण्यासाठी गेला असता गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. भावाने सत्यजीतला तातडीने उपचारासाठी कोडोली येथील यशवंत रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढले
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Crime) आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक, नैराश्य आणि काहीवेळा शुल्लक कारणातून आत्महत्या केल्याच्या घटना जिल्ह्यात सातत्याने समोर येत आहेत. तुटलेला संवादही आत्महत्यांमागे कारणीभूत ठरत आहे.
अगदी किरकोळ कारणातूनही टोकाचे पाऊल उचलले जात आहे. यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी करवीर तालुक्यातील वयाची पंचवीशी सुद्धा पार न केलेल्या एकुलत्या एक मुलीने आत्महत्या केली होती. यापूर्वी त्याच तरुणीच्या मोठ्या बहिणीने सुद्धा दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यामुळे दुर्दैवी आई वडिलांना मुलीच्या अशा निर्णयाने निराधार होण्याची वेळ आली आहे. करवीर तालुक्यातील बीडशेडमध्ये सानिका सर्जेराव सातपुते (वय 24) या तरुणीने राहत्या घरीच ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली होती.
आजरामध्ये मुलाची घरात आत्महत्या
अन्य एका घटनेत डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील आजरा (Ajara taluka) तालुक्यातील उत्तूर या ठिकाणी भयंकर अशी घटना घडली होती. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलाचा शोध लागत नसल्याने आई कासावीस झाली होती. तिच्या परीने सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, लेकराचा शोध काही लागत नव्हता. मात्र, पाच दिवसांनी भाड्याने राहत असलेल्या घरात दुर्गंधी येऊ लागल्यानंतर तिने माळ्यावर जाऊन पाहिले असता मुलाने आत्महत्या केल्याचे दिसून आले. मुमेवाडी आजरा येथील भिऊगंडेत स्वप्नील शिवाजी भिवंडी (वय 28) हा आईसोबत भाड्याच्या घरात राहत होता. वडील वारल्यानंतर आईनेच स्वप्निलचा सांभाळ केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या