एक्स्प्लोर

Shaktipeeth Expressway: चंदगड विधानसभा मतदारसंघामधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी सात बारा हातात घेऊन पदयात्रा

Shaktipeeth Expressway: आमदार शिवाजी पाटील अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावेळी महामार्गाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पाटील यांनी टीका केली.

Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग चंदगड विधानसभा मतदारसंघातून व्हावा म्हणून शेतकरी आपले सात बारा उतारे घेऊन महामार्ग समर्थनासाठी काढलेल्या पदयात्रेत सहभागी झाले. गडहिंग्लज शहरात ही पदयात्रा काढण्यात आली. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या मतदारसंघांमधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा यासाठी प्रशासनाला पत्र दिलं होतं. यानंतर चारच दिवसांपूर्वी शक्तीपीठ महामार्गाला विरोध म्हणून गडहिंग्लजमध्ये रास्ता रोको आंदोलन झाले. मात्र, आज हजारो शेतकरी आपले सातबारा उतारे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले. यावेळी चंदगड विधानसभा मतदारसंघांमधून शक्तिपीठ महामार्ग व्हावा अशी मागणी करण्यात आली. आमदार शिवाजी पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. यावेळी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर शिवाजी पाटील यांनी जोरदार टीका केली. आंदोलन करणारे नेते मॅनेज होणारे आहेत, त्यांना दुसरं आता काही काम नाही म्हणून चांगल्या प्रकल्पाला विरोध करत आहेत, अशी टीका देखील शिवाजी पाटील यांनी केली. 

जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांनीच सात बारा दिले

दरम्यान, मुंबईत दोन दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील 35 शेतकऱ्यांनीच सात बारा दिले असून 1 टक्काही लोकांचे शक्तीपीठ महामार्गास समर्थन नसल्याचे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत माणगावमधील 6 लोक घेऊन गेले होते. मात्र त्यातील 3 लोकांचीच जमीन संपादित केली जाणार आहे, उर्वरीत तीन लोक भुजगावणे म्हणूनच घेऊन गेले होते, असा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला.  ते म्हणाले की, राजेश क्षीरसागर यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ मुंबईत बैठकीत घेतली. या बैठकीत 35 लोकांनी सात बारा शासनाकडे जमीन संपादनास दिले असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 3822 गटधारकांची जवळपास 5300 एकर संपादित केली जाणार असून या गटामध्ये 10 हजारहून अधिक शेतकरी समाविष्ट आहेत. यामुळे गटधारकांच्या 1 टक्काही लोकांचे या महामार्गास संमती नसल्याचे यावरून स्पष्ट झाले. यामुळे राज्य सरकार शक्तीपीठ समर्थनासाठी जो खटाटोप करत आहे त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. ज्यापध्दतीने कोल्हापूरची करवीर निवासनी अंबाबाई देवीने कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आता कोल्हापुर शहरातील जनतेला पुराच्या खाईत लोटणाऱ्या शक्तीपीठ महामार्ग रूपी राक्षसापासून कोल्हापूरच्या जनतेचे रक्षण आई अंबाबाईच करेल.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Iran vs Israel war: इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
इराण-इस्रायल युद्धाचा भडका, राज्य सरकारचा मोठा निर्णय, इंडस्ट्रीसाठी गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद, दोन दिवसात व्यावसायिक गॅसही बंद होणार?
Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
पूर्ववैमनस्यातून पोलिसांसमोरच केला गोळीबार, एक जण गंभीर, धक्कादायक घटनेनं इचलकरंजी हादरलं
Israel vs Iran War: दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!
दुबई प्रशासनाचा दिलदारपणा, कोल्हापूरच्या पर्यटकांना प्रत्येकी 26 हजारांचं गिफ्ट, झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरीही व्यक्त!

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chana Price Crisis : हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
हमीभाव 5,875 मात्र अकोल्यात हरभऱ्याची 4,800 ला खरेदी; शेतकऱ्यांची ‘मातीमोल’ विक्री
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्न अपयशी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नो रिस्पॉन्स, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा शेवटचा प्रयत्नही फसला, अखेर शरद पवार मविआचे उमेदवार बनले, इनसाईड स्टोरी समोर
Team India : जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
जिंकण्यासाठी अंधश्रद्धा? टीम इंडियाने अहमदाबादचं हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली; 'मोदी स्टेडियम'वरच्या पराभवाची आठवण पुसण्यासाठी निर्णय? 
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Embed widget