Drugs Case : केरळमध्ये 'लिव्ह इन' रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोन महिलांना ड्रग्जचा पुरवठा केल्याप्रकरणी अटक
या दोन्ही महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना अमली पदार्थांचा पुरवठा करत होत्या, असा पोलिसांना संशय होता.
Kerala Narcotic Sale : केरळमधील (Kerala) त्रिशूर (Trishur) जिल्ह्यात लोकांना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी (5 जून) कुन्नमकुलमजवळ वाहन तपासणीदरम्यान या दोन महिलांना 17.5 ग्रॅम अंमली पदार्थांसह (Drugs) पकडण्यात आले आहे. एका महिला पोलिस अधिकारीने सांगितले कि, सुरभी (23) आणि प्रिया (30) नावाच्या दोन महिलांना अटक करण्यात आली असून अटक करण्यात आलेल्या महिलांमध्ये एक फिटनेस ट्रेनर (Fitness Trainer) आहे. दुसरी फॅशन डिझायनर (Fashion Designer) आहे. दोन्ही महिला 'लिव्ह-इन' रिलेशनशिपमध्ये (Live-in-relationship) असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान सुरभीने सांगितले कि, एका पार्टीच्या दरम्यान तिने अंमली पदार्थाचे सेवन केले होते. त्यानंतर तिला अंमली पदार्थाचे सेवन करण्याची सवय लागली. काही काळानंतर ती अंमली पदार्थ पैशासाठी विकायला लागली. या दोन महिलांचे बेंगळुर मधील एका मोठ्या ड्रग्ज रॅकेटशी थेट संबंध होते. पोलिसांना या महिलांबद्दल माहीती मिळाल्यानंतर पोलिसांच्या टीमने ग्राहक म्हणून संबंधित महिलांना संपर्क करून ड्रग्जची मागणी केली आणि यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
सोशल मीडियाद्वारे अमली पदार्थाची विक्री
पोलिसांनी सांगितले कि, या दोन महिलांचे सोशल मीडियावर (Social Media) बरेच फाॅलोअर्स (Followers) होते. सोशल मीडियाद्वारे या महिलांनी अमली पदार्थांचा पुरवठा केला असल्याचा संशय ही पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या विविध वयोगटातील आणि विविध समाजातील लोकांची माहिती देताना ते म्हणाले, 'दोघीही महिला बऱ्याच दिवसांपासून अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करत होत्या, असे आम्हाला वाटते. त्यांच्याकडे या पदार्थांच्या विक्रीसाठी कोणत्याही विशिष्ट वयोगटातील लोक नव्हते. सर्वच प्रकारच्या लोकांना या महिला ड्रग्ज पुरवत होत्या.
आरोपी टीव्ही मालिकेची सहाय्यक दिग्दर्शिका
आरोपी महिलांमधील एक महिला टीव्ही सीरियलमध्ये असिस्टंट डायरेक्टर (Assistant Director) म्हणून काम करत होती. मात्र या माहीतीबाबत पोलिसांनी काही सविस्तर सांगितले नाही. त्यांनी सांगितले की दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना स्थानिक कोर्टाने कोठडीत पाठवले आहे. केरळ पोलीस अशा प्रकारच्या मोहिमा राबवून अमली पदार्थांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी प्रयत्न करत आहे.