Kangana Ranaut : कंगना रनौतची राजकारणात एन्ट्री? म्हणाली,"2024 च्या निवडणुकीत फक्त भगवा रंग..."
Kangana Ranaut : कंगना रनौत राजकारणात एन्ट्री करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
Kangana Ranaut On Politics : बॉलिवूडची 'पंगाक्वीन' कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. बॉलिवूडसह सामाजिक मुद्द्यांवर ती तिची मतं मांडत असते. कंगना रनौत राजकारणात एन्ट्री करणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अभिनेत्रीने आता राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल भाष्य केलं आहे.
टाइम्स नाउला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौतला (Kangana Ranaut On Politics) राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अभिनेत्री म्हणाली,"कलाकार असल्यामुळे राजकारणात एन्ट्री करण्याबद्दल मी खूप इच्छुक आहे. पण सध्या तरी मी राजकारणात एन्ट्री करणार नाही. भारत देश प्रत्येक दिवशी प्रगती करत आहे".
कंगना रनौत पुढे म्हणाली,"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची मला संधी मिळाली. दोन-तीन वर्षांपूर्वी मी त्यांना भेटले होते आणि आता पुन्हा हा योग आला. मोदी सरकार आल्यापासून देशात प्रगती होत आहे ही आनंददायी बाब आहे. देशात सकारात्मक बदल होत आहेत. 2024 च्या निवडणुकीत फक्त भगवा रंग पाहण्याची माझी इच्छा आहे". कंगना रनौतच्या वक्तव्यावरुन 2024 मध्ये ती मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच कंगनाने जर राजकारणात एन्ट्री घेतली तर भाजपमधून निवडणूक लढवू शकते.
कंगना रनौतच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या... (Kangana Ranaut Upcoming Movies)
कंगना रनौतचा 'धाकड' (Dhakad) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अभिनेत्रीचा अॅक्शन मोड पाहायला मिळाला. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. त्यानंतर तिने 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमाची निर्मिती केली. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत होते.
View this post on Instagram
कंगनाच्या आगामी 'चंद्रमुखी 2' या सिनेमाची आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या सिनेमात कंगना रनौतचा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कंगनाचा 'इमरजेन्सी' हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. या सिनेमात ती इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. दुसरेकर बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत 2024 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
संबंधित बातम्या