Kangana Ranaut : विमानतळावर CISF च्या महिला जवानने कानशिलात लगावली; कंगना रणौतचा आरोप
Kangana Ranaut : चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.
Kangana Ranaut : अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या विजयी उमेदवार कंगना रणौतच्या (Kangana Ranaut) कानशिलात लगावली असल्याची माहिती समोर आली आहे. चंदिगड विमानतळावर सीआयएसएफच्या महिला जवानाने कानशिलात लगावली असल्याचा आरोप अभिनेत्री कंगना रणौतने केला आहे.
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौत आज दिल्लीला रवाना झाली. त्या दरम्यान ती चंदिगड विमानतळावर असताना तिला सीआयएसएफच्या महिला जवानाने मारहाण केली असल्याचे आरोप कंगनाने केला आहे.
समोर आलेल्या वृत्तानुसार, कंगनाने शेतकरी आंदोलनादरम्यान महिला आंदोलकांबाबत वक्तव्य केले होते. त्याच वक्तव्यावर नाराज असलेल्या सीआयएफएफच्या महिला जवान कुलविंदर कौर यांनी कानशिलात लगावली असल्याचा आरोप कंगनाने केला.
कंगना रणौतला का मारले?
कंगनाच्या राजकीय सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदिगड विमानतळावर हा सगळा प्रकार घडला. सीआयएफएफच्या महिला जवानाने कंगनाच्या कानशिलात लगावली. कंगनासोबत गैरवर्तवणूक करणाऱ्या महिला सीआयएसएफ जवानावर कारवाई करावी. शेतकरी आंदोलनावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी सीआयएसएफ महिला जवान कंगनावर नाराज होती.
WATCH | कंगना पर थप्पड़ मारने वाली CISF महिला जवान की वीडियो आई सामने#KanganaRanaut #Breaking #LokSabhaElection2024 #news #hindi #hindinews #latestnews #latestupdates #abpnews #india pic.twitter.com/2okrF1R9W5
— ABP News (@ABPNews) June 6, 2024
दिल्लीला जात होती कंगना
हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा निवडणुकीत कंगनाने दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ती आज दिल्लीला रवाना झाली. याच दरम्यान चंदिगड विमानतळावर तिच्या कानशिलात लगावली असल्याचे वृत्त समोर आले. कंगनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिल्लीला जात असल्याचे सांगितले.
विमानतळावरून काहीच बोलता निघून गेली कंगना
कानशिलात लगावल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्ली विमानतळावर पोहचलेल्या कंगना रणौतला पापाराझींनी या घटनेबाबत विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर कंगनाने कोणतेही भाष्य केले नाही.
#WATCH | BJP leader and actor Kangana Ranaut arrives at Delhi airport
— ANI (@ANI) June 6, 2024
A constable-rank CISF officer allegedly slapped Kangana at Chandigarh Airport during a frisking argument. An inquiry committee comprising senior CISF officers has been set up to conduct a further… pic.twitter.com/kUHmg7PsAs
लोकसभा निवडणुकीत विजय...
View this post on Instagram
राजकारणात नशीब आजमावण्यासाठी कंगना राणौत पहिल्यांदाच मंडीतून रिंगणात उतरली. भाजपने कंगनाला तिच्या स्वतःच्या जिल्ह्यातून मंडी मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. निवडणुकीत कंगनाने जोरदार प्रचार केला. काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांना कंगनाने 74 हजारांच्या मताधिक्याने पराभूत केले.