एक्स्प्लोर

बँक अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या? नातेवाईकांचा आरोप, मृतदेह पोलीस ठाण्यात 

जालन्यातील अंबड तालुक्यातील करंजळा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एसबीआय बँकेतील व्यवस्थापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केलाय.

Jalna Farmer Suicide News : जालन्यातील अंबड तालुक्यातील करंजळा येथील 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एसबीआय बँकेतील व्यवस्थापकाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी गेल्या चार तासापासून गोंदी येथील पोलीस ठाण्यामध्ये मृतदेह ठेवला आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे.  कृष्णा आमटे असे  मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेणार

जोपर्यंत शाखा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची आक्रमक भूमिका नातेवाईकांसह करंजळा गावकऱ्यांनी घेतली आहे. कर्ज प्रकरणावरुन तगादा लावल्याने ही आत्महत्या झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळं आता या प्रकरणी पोलीस प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडं देखील सर्वाचं लक्ष लागलं आहे. गावकऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

विदर्भासह मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण जास्त

राज्यात सातत्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसत आहे, नापिकी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ अशा विविध कारणांनी शेतकरी आपलं आयुष्य संपवत आहेत. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात सर्वात जास्त आत्महत्या होतात. विधानसभा निवडणुकीच्या 60 दिवसाच्या काळात विदर्भातील तब्बल 167 शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. महाराष्ट्रात उर्वरित ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे वक्तव्य किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले (Ajit Nawale) यांनी केलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं ही बाब लक्षात घेत महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज देत शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी पावलं टाकावीत अशी मागणी किसान सभेनं केली आहे.

शेतकरी प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी शासनानं पुढाकार घ्यावा

राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.  शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. तसेच आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. या आत्महत्या रोखण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असा सवालही करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Farmer Suicide : धक्कादायक! विदर्भातील 6 जिल्ह्यात 2001 पासून आतापर्यंत 27 हजार 324, तर गेल्या 6 महिन्यात 618 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
पंतप्रधान मोदी 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहेत, NEET पेपर लीकवर राहुल गांधी संतप्त
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
PM मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले; मनसेप्रमुखांवर महायुतीचा पलटवार, नितेश राणे, कदम पिता-पुत्रांचा वार
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
जळगावात लघु पाटबंधारेच्या भूसंपादनात कोट्यवधींचा घोटाळा; 2 वकिलांसह 7 शेतकऱ्यांविरुद्ध गुन्हा, उडाली खळबळ
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
मोठी बातमी! NEET पेपरफुटीत नाशिकमधून 30 वर्षीय युवकास अटक, हेअरस्टाईल बदलून फिरायचा; सीबीआय ॲक्शन मोडवर
NEET Exam Cancelled : नीट परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
NEET परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संताप, मानसिक आणि आर्थिक ताण वाढला
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Embed widget