बांगर एवढा माज चांगला नाही; जनताच तुम्हाला फाशी देईल; संतोष बांगर यांच्या चॅलेंजवर शिवाजीराव चोथेंचे जोरदार प्रत्युत्तर
Shivajirao Chothe : तुम्हाला फाशी घ्यायची गरज नाही, जनताच तुम्हाला फाशी देईल. अशा शब्दात संतोष बांगर यांनी दिलेल्या चॅलेंजवर ठाकरे गटाचे नेते शिवाजीराव चोथे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Hingoli News हिंगोली : 2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईल, असे वक्तव्य संतोष बांगर यांनी केले आहे. त्यांच्या या चॅलेंजवर ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे (Shivajirao Chothe) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तुम्हाला फाशी घ्यायची गरज नाही, जनताच तुम्हाला फाशी देईल. त्यावेळी आम्ही तिथे जल्लोष करायला येऊ, असे शिवाजीराव चोथे म्हणाले. ते जालना येथे बोलत होते.
काय म्हणाले शिवाजीराव चोथे?
या राज्यात जनतेने चांगले-चांगले राजे-महाराजे, मोठमोठ्या सलतनती उलथवून टाकल्या आहेत. त्यापुढं 'तूम किस झाड की पत्ती हो', बांगर एवढा माज चांगला नाही. एकदा निवडणूक येउ द्या, जनता तुम्हाला फाशी दिल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आम्ही तिथे येऊन जल्लोष करू, अशा शब्दात ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी संतोष बांगर यांच्या त्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले आहे.
संतोष बांगर यांचं चॅलेंज
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसे झाले नाही तर स्वतः भर चौकात फाशी घेणार असल्याचे चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. संतोष बांगर यांच्या नव्या चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याआधीही त्यांनी मिशी कापण्याचं चॅलेंज केले होते.
मिशी कापण्याचं चॅलेंज
कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता न आल्यास मिशी कापेल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी याआधी दिलं होतं. पण निवडणुकीनंतर येथे महाविकास आघाडीची सत्ता आली. महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची राज्यभर चर्चा झाली होती. आमदार बांगर यांनी या निवडणुकीवरुन चॅलेंज दिले होते. "या पॅनेलच्या 17 पैकी 17 जागा निवडून नाही आल्या तर मिशी ठेवणार नाही, असं आमदार संतोष बांगर म्हणाले होते. त्यावेळीही त्यांची जोरदार चर्चा झाली होती.
संतोष बांगर आणि वाद
संतोष बांगर आणि वाद काही नवा नाही. ते अनेकदा वादात अडकले आहेत. 26 जून 2022 शिवसेनेसोबत बेईमानी करणाऱ्यांच्या बायका त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाहीत त्यांची मुले अविवाहित मरतील या विधानानंतर वाद झाला होता. 17 जुलै 2022 गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा या विधानानंतर मोठा वाद झाला.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
