एक्स्प्लोर

'मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती नकोच', मनोज जरांगेंची नवी मागणी

Maratha Reservation : नोकरभरती करण्याचा निर्णय घेतांना मराठ्यांच्या सर्व जागा राखी ठेवून नोकरभरतीचा निर्णय घ्या, तर आम्हाला मान्य आहे, असे जरांगे म्हणाले. 

जालना: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्यात नोकरभरती करू नयेत अशी नवी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या लढाईची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या वतीने महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत बोलतांना मनोज जरांगे यांनी 'मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकरभरती कर नयेत' असा मुद्दा मांडला. त्यांच्या याच मागणीला उपस्थितीत मराठा बांधवांनी होकार दर्शवला आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या लेकरांना जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत या राज्यात नोकरभरती करायची नाही. जर, तुम्हाला नोकरभरती करायची असेल, तर मराठ्यांना काही हरकत नाही. मराठे कुणाच्याही लेकरांचं वाटुळं होऊ देणार नाही. पण, नोकरभरती करण्याचा निर्णय घेतांना मराठ्यांच्या सर्व जागा राखी ठेवून नोकरभरतीचा निर्णय घ्या, तर आम्हाला मान्य आहे, असे जरांगे म्हणाले. 

अंतिम निर्णय बीड येथील 23 डिसेंबरच्या सभेत घेतला जाणार

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आंतरवाली सराटी गावात मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत राज्यभरातील मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. 24 डिसेंबरनंतर पुढील आंदोलन कसे असणार याबाबत या बैठकीत निर्णय घेतला जाणार होता. मात्र, आता हाच निर्णय बीड येथील 23 डिसेंबरच्या सभेत घेतला जाणार आहे. उद्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारची भूमिका मांडणार आहे. त्यामुळे त्यांचे म्हणणे काय आहे, हे समजल्यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. 

आंतरवाली सराटीत मोठी गर्दी... 

मराठा आरक्षणाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीत बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला मराठवाड्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यातील मराठा बांधव उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. नियोजन बैठकीचे असताना, प्रत्यक्षात गर्दी सभेप्रमाणे झाली होती. त्यामुळे आजच्या या बैठकीत मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

ओबीसींचं आरक्षण मागत नाही

दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, "आरक्षणाला फक्त राजकीय इच्छाशक्ती लागते. मतासाठी आमच्या पोरांचे मुडदे पाडणार का? जरांगे यांनी सरकारला सवाल केला. आपला भोळा आणि अतिविश्वासू समाज आहे. आपल्याला तात्पुरता आरक्षण नको पाहिजे. ओबीसींच्या लेकरांचे काढून आम्ही आरक्षण मागत नाही. ज्या नोंदी मिळाल्या त्या नोंदीचा आधार घेऊन सरकारने 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्यावेत. वेळ घेतांना सर्व मंत्री आणि सर्वात मोठे कायदा तज्ञ होते. ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर आणि कागदावर जे ठरलय त्या आधारावर तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यावे. सरकार 24 डिसेंबरपर्यंत 100 टक्के आरक्षण देतील अशी अपेक्षा आहे, परंतु आम्ही का सावध राहू नये? म्हणून बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मोठी बातमी! आंतरवाली सराटीत मनोज जरांगेंच्या बैठकीला सुरवात, महत्वाच्या विषयावर चर्चा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025Mahadev Munde Beed Case : महादेव मुंडेंच्या पत्नीची एबीपी माझावर EXCLUSIVE प्रतिक्रिया, काय केली मागणी?Saif Ali Khan Update : सीसीटीव्हीत दिसणारा आणि अटकेतल्या व्यक्तीत साम्य नाही,आरोपीच्या वकिलाचा दावाST Bus Hike : सर्वसामान्यांना झटका!एसटीचा प्रवास महागला, रिक्षा आणि टॅक्सीचीही भाडेवाढ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Amit Shah : भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
भुजबळांना मंचावर पाहताच अमित शाहांच्या 'त्या' कृतीनं भुवया उंचावल्या; नेमकं काय घडलं?
Embed widget