Jalna Crime News: सासूचं डोकं भिंतीवर आपटून संपवलं, मृतदेह गोणीत भरुन सून घरातून फरार, जालना हादरलं
Jalna Crime News: जालन्यात सुनेने सासूची निर्घृणपणे हत्या केल्याचं समोर आलं आहे. भिंतीवर डोकआपटून सुनेने सासूची हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Jalna Crime News: जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जालन्यात सुनेनेच सासूची हत्या केल्याचं समोर आलं आहे. भिंतीवर सासूचं डोकं आपटून सुनेने सासूची हत्या (Jalna Crime News) केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जालना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील धक्कादायक घटना घडली आहे. सविता शिंगारे वय 45 वर्ष असं मयत महिलेचं नाव आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळी जालन्यातील सदर बाजार पोलीस दाखल झाले आहेत. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पोलिसांनी जालना सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. संशयित आरोपी सून प्रतीक्षा शिंगारे हिच्या शोधासाठी सदर बाजार पोलिसांची दोन पथक रवाना झाले आहेत.(Jalna Crime News)
पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीतील ही घटना आहे. दोन महिला एकत्रित राहत होत्या. सुन आणि सासू असं त्यांचं नातं आहे. त्यांचा मुलगा कामासाठी बाहेर जातो, त्या ठिकाणी घरी सुनेने सासूची हत्या केली आहे. सासूची हत्या करून मृतदेह एका गोणीमध्ये भरला. त्या मृतदेहाची विल्हेवाट (Jalna Crime News) लावण्यासाठी सुनेचे प्रयत्न असताना त्या घरमालकाने ही घटना पाहिली त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी देण्यात आलेलं आहे. आरोपी फरार झाली होती. आरोपीला पकडण्यासाठी पोलिस तपास करत आहेत. प्रथमदर्शनी डोक्यावरती मार दिसून येत आहे. भिंतींवरती डोकं आपटून मारल्याचं दिसून येत आहे. आरोपीचा तपास सुरू आहे. मयत आहे त्यांचं नाव आहे सविता शिंगारे आणि सुनेचं नाव आहे प्रतिक्षा शिंगारे. घरी कॅमेरे आहेत त्यांचा तपास केला जाईल. घटनास्थलाचा पंचनामा केला आहे, अशी माहिती देखील अप्पर पोलीस अधीक्षक जालना आयुष नोपानी यांनी दिली आहे.
संशयित आरोपी असलेल्या सुनेला परभणी पोलिसांनी ताब्यात घेऊन तिला जालना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. दरम्यान सासूची हत्या करण्यामागे सुनेचा काय हेतू होता हे चौकशीनंतर स्पष्ट होऊ शकणार आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे























