(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange Sabha: मनोज जरांगेंच्या भाषणातील 'या' आहेत प्रमुख मागण्या
Maratha Reservation : सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या काळात आम्ही तुम्हाला काहीच बोललो नाही. आणखी 10 दिवस शिल्लक असल्याचे जरांगे म्हणाले.
जालना: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आंतरवाली गावातील सभेला सुरवात झाली असून, जरांगे यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच आपल्या प्रमुख मागण्यांची माहिती दिली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये सहभाग करावा, अशी त्यांची प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आणखी 10 दिवस सरकारच्या मुदतीचे उरल्याची आठवण देखील यावेळी करून दिली आहे.
मनोज जरांगेंच्या भाषणातील 'या' आहेत प्रमुख मागण्या
1) सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा
2) कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी
3) मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी
४) दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या
5) PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे
6) महाराष्ट्रातील मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्या. NT, VJNT प्रवर्गासारखे टिकणारे आरक्षण द्या.
पुढील दिशा 22 ऑक्टोबरला कळवणार
दरम्यान यावेळी पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, मराठा समाज एक होत नाही असे संगणाऱ्यांच्या आज झालेल्या गर्दीने मुसकडात मारली आहे. आमची मुळ मागणी ही महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये सहभाग करावा, अशी आहे. कोपर्डी घटनेतील नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. प्रत्येक दहा वर्षाला ओबीसी समाजाचं सर्वेक्षण करण्यात यावे. सारथीमधून पीएचडी करणाऱ्यांना अधिकचा निधी देण्यात यावा. सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. या काळात आम्ही तुम्हाला काहीच बोललो नाही. आणखी 10 दिवस शिल्लक आहे. मात्र, त्यानंतर जर आरक्षण मिळाला नाही तर, तुम्हाला 40 दिवसांनंतर सांगतो आम्ही काय करणार. पुढील दिशा 22 ऑक्टोबरला कळवणार असल्याचे जरांगे म्हणाले.
सभेला प्रचंड गर्दी...
मनोज जरांगे यांच्या सभेला प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मराठवाड्यासह राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून मराठा बांधव या सभेला आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सभेसाठी तयार करण्यात आलेलं संपूर्ण मैदान भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महिला, मुलं, तरुणीसह वृद्ध महिला देखील सभेत आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे तरूणांची संधी लक्षणीय आहे. त्यामुळे आजची सभा आतापर्यंतची सर्वात मोठी सभा असल्याचे बोलले जात आहे. ( Manoj Jarange Patil 6 major demands Maratha reservation Maratha should include in OBC give Kunbi certificate )
इतर महत्वाच्या बातम्या: