अर्जुन खोतकर जरांगेंच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांचं पत्र दिलं, पण जरांगे म्हणाले...
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं.
Manoj Jarange Patil News: (अंतरवाली सराटी जालना) : मुंबईत सरकार आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाची शुक्रवारी रात्री बैठक झाली होती. त्यामुळे जरांगे आज काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दरम्यान जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आमच्यावर लाठीमार करून उलट आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे हे गुन्हे लगेच मागे घेण्यात यावेत. तसेच आमच्यावर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कोणतेही सक्तीची कारवाई होतांना दिसत नाही. फक्त एका अधिकाऱ्याला सक्तीच्या रेजवर पाठवण्यात आले, त्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जरांगे यांनी अर्जुन खोतकर यांच्या माध्यमातून सरकारकडे केली आहे. तर जरांगे यांचे शब्द न शब्द मुख्यमंत्री यांच्याकडे पोहचवणार असल्याचे खोतकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी पाठवले पत्र...
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांचे एक शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. तसेच जरांगे यांच्या शिष्टमंडळाचे म्हणणं ऐकून घेत सरकारने काही बदल करण्यास सहमती दर्शवली असल्याची देखील माहिती आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना एक बंद पाकिटात पत्र देखील पाठवले आहे. हेच बंद पाकीट घेऊन शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर अंतरवाली सराटी गावात दाखल झाले. त्यांनी हे पत्र मनोज जरांगे यांना दिले असून त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी बाहेर फिरतायत, जरांगेंनी आपली भूमिका स्पष्टचं मांडली
लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आलेली नाही. फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तत्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
खोतकर म्हणाले उपोषण मागे घ्या!
दरम्यान, अंतरवाली गावात पोहचल्यावर अर्जुन खोतकर यांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला बंद पाकीट आणि त्यातील मसुदा मनोज जरांगे यांच्याकडे सोपवले. तसेच, कालच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुद्यावर समिती स्थापन करण्यात आली असून, एक महिन्याचा वेळ देण्याची मागणी मुख्यंमत्री यांनी केल्याची माहिती खोतकर यांनी दिली. त्यामुळे, जरांगे यांनी आपल्या प्रकृतीची काळजी घेत सध्या उपोषण मागे घेण्याची विनंती खोतकर यांनी यावेळी केली. मात्र जरांगे आपल्या उपोषणावर कायम आहे.
इतर महत्वाची बातमी: