एक्स्प्लोर

Maratha Reservation : आरक्षणासाठी विशेष अधिवेशन कशाला? आताच चार दिवस वाढवा, 24 डिसेंबरनंतर एक तासही वाढवून मिळणार नाही; मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

Manoj Jarange : मराठा आणि कुणबी हे एकच असून आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी सरकारला आणखी वेळ वाढवून देण्यास नकार दिला आहे. 

जालना: भानावर या आणि आंदोलन गांभिर्याने घ्या, मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विशेष अधिवेशनाचा घाट कशाला घालताय? आहे त्याच अधिवेशनात चार दिवस वाढवून घ्या आणि आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange)  यांनी केली आहे. जे काही करायचं आहे ते 24 पर्यंत करा, त्यानंतर मात्र एक तासही वाढवून मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. 

अनेकदा मुदत वाढवून दिली, आम्ही येडे आहे का? 

मनोज जरांगे म्हणाले की, हे सरकार विशेष अधिवेशनाच्या नावाखाली वेळकाढू पणा करण्याचा प्रयत्न करतयं. विशेष अधिवेशनाचा घाट घालून वेळकाढूपणा करू नका. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आम्ही त्यामध्ये बसतोय, बाकी कशातून आरक्षण दिला तर ते टिकणार नाही. त्यामुळे बाकी आरक्षण देऊन सरकारने मराठ्यांची फसवणूक करू नये. 

सर्व मराठे एकच

राज्यातील सर्व मराठे एकच असल्याचं सांगत मनोज जरांगे म्हणाले की, विदर्भातील मराठे आणि मराठवाड्यातील मराठ्यांचे संबंध आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे नातेवाईक आहेत. त्यामुळे राज्यातील सर्व मराठे एकच आहेत. सध्या आरक्षण हा एकच विषय आहे, त्यामुळे आपापसातील मतभेद बाजूला सारावं आणि मराठा आरक्षणासाठी एकत्र यावं.

आई कुणबी असेल तर अपत्यांना आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. ते म्हणाले की, शिंदे समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे मराठ्यांना आरक्षण द्या. मराठे आणि कुणबी हे एकच असून त्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. 

मनोज जरांगेच्या आतापर्यंतच्या मागण्या - 

  • महाराष्ट्रातील समस्त मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
  • मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा.
  • मराठा समाजासाठी बलिदान देणाऱ्या 45 बांधवांना सांगितलेला निधी व सरकारी नोकरी द्यावी.
  • दर 10 वर्षाला आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवाचा सर्व्हे करावा आणि प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात.
  • सारथी संस्थेमार्फत पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देवून त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावावेत.
  • मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरीही चालेल पण टिकणारं आरक्षण हवं आहे.
  • कोपर्डीच्या ताईवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी.
  • नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या.
  • नोंद सापडली पण त्यांना माहीत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन सांगा.
  • नोंदीच्या आधारावर कुटुंबाला आरक्षणात घ्या.
  • सर्व नातेवाईक सुद्धा आरक्षणात घेतले पाहिजे.
  • रक्ताच्या सर्व नातेवाईकांना आरक्षण दिले पाहिजे.
  • शिंदे समितीचे काम सतत सुरू ठेवले पाहिजे.
  • ज्या विद्यार्थ्यांनी राज्यभर सारथी, ईडब्लूएस मार्फत शिक्षण घेतले, किमान 13 हजार पेक्षा अधिक निवडी झाल्यात पण नेमणूक नाही, तातडीनं त्यांना नियुक्ती द्यावी.
  • मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारला विनंती, तोपर्यंत जर तुम्हाला नोकरभरती करायची असेल तर करा, आमची हरकत नाही पण मराठ्यांच्या जागा रिक्त ठेवून पदं भरा.
  • सरकारला पुन्हा विनंती सरकारने नोंदी शोधाव्यात, त्यासाठी भाट लोकांकडे असलेल्या वंशावळी तापसाव्यात, देवीची लस दिली त्यावेळेच्या पण नोंदी आहेत, त्या सुद्धा ग्राह्य धराव्यात.
  • आई ओबीसी असल्यास तिच्या मुलांना देखील ओबीसी प्रमाणपत्र द्यावे ,  सर्व जातीतील आईच्या जातीवरून तिच्या मुलांना प्रमाणपत्र द्यावं, त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
लोकशाही मार्गाने आंदोलन करु देणार नसाल तर जगायंच कसं? विद्यार्थ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात, उद्या थेट दिल्ली गाठणार
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
विकासकामांवरुन सत्तेतील भाजप शिवसेनेचे आजी माजी आमदार आमने सामने, जालन्यात राजकीय वातावरण तापलं
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये सजवलेला हनिमून कोच पडला महागात! डेकोरेटर विरोधात गुन्हा दाखल तर  संबंधित टीसी कर्मचाऱ्याचं देखील निलंबन
नंदिग्राम एक्सप्रेसमध्ये सजवलेला हनिमून कोच पडला महागात! डेकोरेटर विरोधात गुन्हा दाखल तर  संबंधित टीसी कर्मचाऱ्याचं देखील निलंबन

व्हिडीओ

Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam wangchuk: उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर, राज ठाकरे आझाद मैदानात; नीट पेपरफुटीवरुन ठाकरे बंधू थेट आंदोलनात, काँग्रेसंही रस्त्यावर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं दिल्लीत आंदोलन, राहुल गांधींसह महाराष्ट्रातील खासदारही पोलिसांच्या ताब्यात
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
AI तंत्रज्ञानाच्या मदतीने अंधत्वावर मात; गडचिरोली जिल्हा परिषदेचा उपक्रम, 34 विद्यार्थ्यांच्या हाती अत्याधुनिक स्मार्ट उपकरणे
Uddhav Thackeray : एका राजीनाम्यानं चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल, सरकार बदलत नाही तोपर्यंत आयुष्य बदलणार नाही : उद्धव ठाकरे
भाषण करायला नाही युवा शक्तीला नमन करायला आलोय, उद्धव ठाकरेंच्या जंतरमंतरवरील भाषणाला जोरदार प्रतिसाद
Rahul Gandhi : राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
राहुल गांधींची नीट पेपरफुटीवरील संसदेतील चर्चेची मागणी मान्य, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर जितेंद्र सिंह नेमकं काय म्हणाले? 
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
अमरावतीतून वारी, काठी टेकत आली 80 वर्षांची आजी; कलेक्टरांनी दिलं विठ्ठलाचं VIP दर्शन, पुंडलिकाची आठवण
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
दिल्लीत नरेंद्र मोदींच्या घरासमोर राडा, पोलिसांनी राहुल गांधींना उचललं; प्रियंका गांधींसह माजी मुख्यमंत्रीही ताब्यात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जुलै 2026 | मंगळवार
Embed widget