एक्स्प्लोर

'जशास तसे उत्तर मिळणार, तुम्हालाही आमच्या गावात यायचं असेल ना'; फडणवीसांना जरांगेंचा इशारा

Manoj Jarange On Devendra Fadnavis : पोरांना बोलावून त्यांच्यावर निगराणी ठेऊन अन्याय सुरू केले आहे. हे थांबवले नाही तर संपूर्ण लोक मी पोलिसांत घेऊन येणार आहे.

Manoj Jarange On Devendra Fadnavis : मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधला आहे. “सागर बंगल्यावर येतो म्हणून एवढ्या मिरच्या लागल्या. सागर बंगल्यावर गेलोच नाहीत, आम्ही इथूनच म्हटलो तर तुम्ही गुन्हे दाखल केले. पण तुम्हालाही आमच्या गावात यायचं असेल ना, तुम्हाला तिथे बसवलं म्हणजे आमच्या छाताडावर पाय देण्यासाठी बसवले का?, जशास तसे उत्तर मिळणार, तुम्ही आमच्या दारातून चालले की, पोलिसांना आमचे देखील गुन्हे दाखल करून घ्यावी लागतील. जनतेवर अन्याय करून गृहमंत्री काय मिशा मिळणार आहे आणि छाती ठोकणार आहे, असे जरांगे म्हणाले. 

पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, "आमच्यावर अन्याय करण्यासाठी कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांनी एसआयटी नेमली आहे. आम्ही काही न करता आमच्या मागे एसआयटी लावत असाल, तर आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांचे कुटुंबीय सरकार विरोधात 302 चे खटले दाखल करणार आहेत. न्याय तो न्याय तुम्हाला करावा लागेल. गृहमंत्री फडणवीस यांनी पोलिसांच्या माध्यमातून पोरांचा छळ सुरू केलाय. जालन्याच्या एसपींच्या माध्यमातून जाणून बुजून लोकांना बोलवून त्यांच्यावर दहशत निर्माण केली जात आहे. पोरांना बोलावून त्यांच्यावर निगराणी ठेऊन त्यांच्यावर अन्याय सुरू केले आहे. हे थांबवले नाही तर संपूर्ण लोक मी पोलिसांत घेऊन येणार आहे. दहशत करून थांबवण्याचा गृहमंत्र्यांचा समज चुकीचा आहे. असंच सुरू राहिलं तर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये संपूर्ण तालुका जाऊन जाब विचारणार असल्याचे" जरांगे म्हणाले आहेत. 

गृहमंत्री मुंबईत बसून पोलीस स्टेशन चालवत 

गृहमंत्र्यांची दहशत आणि गुंडगिरी राज्यासाठी चांगली नाही. त्यांच्या पक्षासाठी आणि मराठ्यांच्या विरोधात बोलणारे आमदार आणि मंत्री यांच्यासाठी सुद्धा चांगली नाही. आता हसू नका उद्या तुमच्यावर रडण्याची वेळ येईल. ज्या मतदारांची त्यांना गरज आहे, त्याच मतदारांना फडणवीस गुंतवत आहेत. गृहमंत्री मुंबईत बसून पोलीस स्टेशन चालवत आहेत. तुम्हाला वाटत असेल घाबरलेत, खचले असतील. पण आम्ही दोन-चार दिवस वाट बघणार, समाज मजा बघतोय, काहीही झाले तरीही ओबीसीमधूनच आरक्षण घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. 

अन्यथा संपूर्ण राज्य रस्त्यावर उतरवेल

मराठ्यांची सुप्त लाट कोणाला कळत नाही. तुम्ही पोरं गुंतवण्याचा जो डाव सुरू केला आहे, त्याला मुलं घाबरणार नाहीत. फडणीस साहेब महिलांचा वापर करत आहेत, भाजपाचे रुमाल घालून हे डाव तुम्हाला महागात पडणार आहे. मी जालन्याच्या एसपींना आणि डीवायएसपी ना जबाबदार धरणार आहे. मला एका मुलाने फाशी घेण्याचा इशारा दिलाय, त्यानं जर काही केलं तर गृहमंत्र्यासह मी सर्वांवर गुन्हे दाखल करील. यासाठी संपूर्ण राज्य रस्त्यावर उतरवेल, असेही जरांगे म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या छातीत दुखू लागल्याने उपचार सुरू; संभाजीनगरमधील डॉक्टरांचं पथक आंतरवालीला पोहचलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaTop 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP MajhaCM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
Embed widget