मराठ्यांना आरक्षण मिळालं की अयोध्येला नक्की जाऊ, 22 जानेवारीला रस्त्यात आनंद साजरा करु, मनोज जरांगेंचा निर्धार
Manoj Jarange : शंभुराज देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणसंदर्भातील बैठकांना बोलवण्यात आलंय पण मी या बैठकांना जाणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
अंतरवाली सराटी, जालना : मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्यानंतर अयोध्येला (Ayodhya) नक्की जाऊ. तोपर्यंत 22 जानेवारीला आम्ही रस्त्यानं चालताना राम मंदिराचा (Ram Mandir) आनंद साजरा करु, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी म्हटलं. तसेच 20 तारखेपर्यंत राज्य सरकारला चर्चेसाठी दारं खुली आहेत, पण त्यानंतर कोणतीही चर्चा करणार नाही, असा थेट इशारा देखील यावेळी मनोज जरांगेंनी दिलाय. येत्या 20 जानेवारी मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने कूच करतील. तसेच मुंबईत उपोषणाची हाक देखील त्यांनी दिलीये.
आंदोलनात हसू होईल असं कृत्य एकाही मराठ्याने आंदोलनात करू नये,फक्त शांत होऊन आंदोलनात बसा असं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केलंय. त्याचप्रमाणे जर आम्हाला अडवलं तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मुंबई आणि मतदारसंघातील दारात जाऊन बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.
बैठकीला जाणार नाही - मनोज जरांगे
शंभुराज देसाई यांनी मंगळवार 2 जानेवारी रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी मनोज जरांगे यांना पत्र पाठवले आहे. यावर त्यांनी म्हटलं की, शंभुराज देसाई यांनी मला पत्र पाठवून उद्या मुंबईत होणाऱ्या आरक्षणासंदर्भातल्या बैठकांना बोलावलं आहे. पण मी या बैठकांना जाणार नाही. उद्या 4ते 5 मॅरेथॉन बैठका मुंबईत होणार आहेत. तसेच ओबीसीतूनच मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या अशी मागणी आम्ही मु्ख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे केलीये. त्यामुळे सरकारने उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि आम्हाला काय निर्णय घेतला याबाबत कळवावे.
आता अडचण काय?
आता मराठा हे कुणबी असल्याचे ट्रकभर पुरावे सापडले मग आरक्षणात देण्यात अडचण काय आहे? मराठयांनी तुमच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा विश्वास देखील मनोज जरांगे यांनी यावेळी उपस्थित केलाय. त्यामुळे राज्य सरकार आता मराठा आरक्षणावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका
13 तारखेला ओबीसींची बीडमध्ये सभा होणार आहे. यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, तो तुमचा राजकारणासाठी वापर करतोय. आमच्या नोंदी ओबीसींमध्ये सापडल्या आहे. आम्हाला तिथेच आरक्षण हवंय, त्याचं ऐकून फुकटचं भांडण विकत घेऊ नका, तो इकडे सभेत लोक दाखवतो आणि त्याच्यावरील केसेस मागे घेतो असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे यांनी छगन भुजबळांवर टीका केलीये.
हेही वाचा :
Mumbai Maratha Rally : मुंबई आंदोलनाची रूपरेषा आज जाहीर होणार; मनोज जरांगे देणार A टू Z माहिती