एक्स्प्लोर

खोतकर आणि त्यांच्या जावयाने 'क्रिप्टो'च्या माध्यमातून मलिदा खाल्ला; गोरंट्याल यांचा पलटवार

Jalna News: खोतकर आणि त्यांच्या जावयाने 'क्रिप्टो'च्या माध्यमातून मलिदा खाल्ला असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला होता. 

Jalna News: जालना जिल्ह्यात (Jalna District) क्रिप्टो करन्सीचा (Cryptocurrency) मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण आता चांगलेच तापताना पाहायला मिळत आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात उद्योजकाला पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा जावई विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरूनच आता काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) आणि अर्जुन खोतकर यांच्यात आरोप-प्रत्यारोप होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान काल अर्जुन खोतकर यांनी केलेल्या आरोपानंतर आज गोरंट्याल यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. खोतकर आणि त्यांच्या जावयाने 'क्रिप्टो'च्या माध्यमातून मलिदा खाल्ला असल्याचा आरोप गोरंट्याल यांनी केला होता. 

क्रिप्टो'च्या माध्यमातून 500 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला असून, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहणं आवश्यक असताना त्यांनी करन्सीच्या दलालांना पाठिंबा दिल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला गोरंट्याल यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अर्जुन खोतकर आणि त्यांचे जावई यांनीच गरीब गुंतवणूकदारांच्या पैशावर क्रिप्टोच्या माध्यमातून मलिदा खाल्ला आहे. अंदमानला वर्षातून तीन टूर काढण्यात आल्या होते असा आरोप करत, खोतकर परिवार आणि झोल परिवार क्रिप्टो करन्सीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीसोबत फिरतानाचे फोटो गोरंट्याल यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. त्यामुळे आता यावर अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया काय असणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 

गोरंट्याल यांची चौकशी करण्याची खोतकरांची मागणी...

जालना जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 500  कोटींपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झालाय. त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी देखील लाखो लोकांनी यात गुंतवणूक केली असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी अर्जुन खोतकर यांनी केली आहे.तर काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहणं आवश्यक होते. मात्र त्यांनी असे न करता करन्सीच्या दलालांना पाठिंबा दिला. तर गोरंट्याल यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत त्यांच्या देखील चौकशीची करण्याची मागणी खोतकर यांनी केली होती.  

राजकीय वातावरण तापले...

दरम्यान जालना जिल्ह्यात समोर आलेल्या क्रिप्टो करन्सीच्या घोटाळ्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. खोतकर यांच्या जावईवर गुन्हा दाखल होताच, संबध नसतांना आमदार  गोरंट्याल यांनी यात उडी घेतली. यावरून त्यांनी खोतकर यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले. त्यांच्या आरोपांना खोतकर यांनी मंगळवारी उत्तर दिले. दरम्यान आता खोतकर यांच्या टीकेला गोरंट्याल यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे हा वाद आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या: 

जालन्यात क्रिप्टोकरन्सीचा 500 कोटींचा घोटाळा, अनेकांची फसवणूक, उच्चस्तरीय चौकशी करा; अर्जुन खोतकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Vladimir Putin Meet Xi Jinping:ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
NEET Exam Paper Leak Shivraj Motegaonkar: नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report
Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report
RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report
Bandra Garib Nagar Encroachment Crackdown : अतिक्रमणावर अटॅक, मोकळे रेल्वे ट्रॅक Special Report
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
डोनाल्ड ट्रम्प आणि पीएम मोदींची फ्रान्समध्ये G7 परिषदेदरम्यान संभाव्य भेट; 16 महिन्यांनतर आमने सामने येण्याची शक्यता
Nana Patekar On Natsamrat Marathi Play: 'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
'ज्यांनी 'नटसम्राट' नाटक केलं, ते सगळे हार्ट अटॅकनं गेले, मीसुद्धा...'; नाना पाटकेरांच्या वक्तव्यानं सारेच अवाक्
Vladimir Putin Meet Xi Jinping:ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
ट्रम्प यांनी अवघ्या एका आठवड्यापूर्वी हाय होल्टेज चीन दौरा करताच आता रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन सुद्धा पोहोचले; तब्बल 25 व्यांदा दौरा, पुतीन यांच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या
NEET Exam Paper Leak Shivraj Motegaonkar: नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
नीट पेपरफुटी प्रकरणात संशयाची पाल चुकचुकली; सीबीआयकडून बालरोग तज्ज्ञाची कसून चौकशी, लातूरमध्ये नेमकं काय घडलं?
PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! पंतप्रधान मोदी आणि मेलोनींचे फोटो इंटरनेटवर व्हायरल
PM Modi and Meloni: मोदी अँड मेलोनी इन रोम! मोदींनी मेलोनींशी मारल्या गप्पा, खास फोटोसेशन, इंटरनेटवर जोरदार हवा
Nagpur Accident news: नागपूरमध्ये भीषण अपघात, विटांनी भरलेला ट्रक पलटी, केबिनमध्ये झोपलेल्या तीन मजुरांचा झोपेतच दुर्दैवी अंत
नागपूरमध्ये भीषण अपघात, विटांनी भरलेला ट्रक पलटी, केबिनमध्ये झोपलेल्या तीन मजुरांचा झोपेतच दुर्दैवी अंत
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचा पहिला मोहरा ठरला, पुण्यातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आग्रही
विधानपरिषद निवडणुकीसाठी शिंदे गटाचा पहिला मोहरा ठरला, पुण्यातील जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रचंड आग्रही
Petrol Diesel Shortage: इंधन टंचाईचे भीषण वास्तव, आठवडा उलटूनही बुलढाण्यात पेट्रोल डिझेलचा ठणठणाट; परभणी, नंदुरबार, भंडाऱ्यासह अनेक जिल्ह्यांत टंचाईच्या झळा, बळीराजा रडकुंडीला!
राज्यभरात इंधन टंचाईचे भीषण वास्तव, आठवडा उलटूनही बुलढाण्यात पेट्रोल डिझेलचा ठणठणाट; परभणी, नंदुरबार, भंडाऱ्यासह अनेक जिल्ह्यांत टंचाईच्या झळा, बळीराजा रडकुंडीला!
Embed widget