एक्स्प्लोर

जालन्यात क्रिप्टोकरन्सीचा 500 कोटींचा घोटाळा, अनेकांची फसवणूक, उच्चस्तरीय चौकशी करा; अर्जुन खोतकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Jalna: राज्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आला असल्याचं शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी त्यांच्या पत्रात लिहिलंय. 

जालना: जिल्ह्यात क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 500 कोटी पेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा झाला आहे, तसेच राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी देखील लाखो लोकांनी यात गुंतवणूक केली असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी  शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी केली आहे. त्यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र देखील लिहिले असून आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांना लवकरच भेटणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. अधिक पैशाचे अमिष दाखवून या करन्सीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाली असून याचा मास्टरमाईड शोधला जावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. 

काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहणं आवश्यक असताना त्यांनी करन्सीच्या दलालांना पाठिंबा दिल्याचा आरोप अर्जुन खोतकर यांनी केला. गोरंट्याल यांची भूमिका संशयास्पद असल्याचं सांगत त्यांच्या देखील चौकशीची मागणी खोतकर यांनी केली आहे. 

क्रिकेटपटू आणि अर्जुन खोतकरांचा जावई विजय झोल विरोधात गुन्हा 

भारताच्या अंडर-19 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारात उद्योजकाला गुंडाकरवी पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणी जालन्यातील घनसांगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विजय झोल याची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

विजय झोल याच्यावर नेमका आरोप काय?

उद्योजक किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन विजय झोलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल याने गुंतवणूक केली होती. परंतु या करन्सीची मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरुन क्रिकेटर विजय झोल आणि त्याच्या भावाने काही गुंड घरी पाठवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केला आहे. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटपटू विजय झोल, त्याचा भाऊ विक्रम झोल यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget