एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Jalna News: जालना जिल्ह्यात वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता; प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

Jalna Rain News: जालना जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

Jalna Rain News: गेल्या चार दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबईतील कुलाबा येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र यांनी दिलेल्या सुचनेनुसार जालना जिल्ह्यात (Jalna District) उद्या (11 एप्रिल) पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची व ताशी 30-40 किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

जालना जिल्ह्यात उद्या (11 एप्रिल) पर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे नागरीकांना दक्षता घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडाजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या लोंबकळणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. 

अशी घ्या काळजी! 

तसेच अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवात्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच सर्व नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथील दुरध्वनी क्र. 02482-223132  यावर संपर्क साधावा, असे आवाहन प्र. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली कानडे-पवार यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या : 

EI Nino 2023: राज्यावर ‘अल निनो’चं संकट?; सरकारकडून समिती स्थापन; फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
MVA Seat Sharing : मविआच्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये मुंबईतील तीन जागांवरुन रस्सीखेच, मतदारसंघ कुणाला मिळणार?
मुंबईतील तीन जागांवर ठाकरेंच्या सेनेचा अन् काँग्रेसचा दावा, मविआच्या जागा वाटपात मुंबईत सर्वाधिक जागा कोण लढणार? 
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : 08 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3:आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत,तासाभराचा प्रवास अवघ्या 22मिनिटांवरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
गरबा किंगला पुण्यात दांडिया खेळताना हार्टअटॅक; मुलासमोर जागेवरच खाली कोसळला अन् खेळ संपला
MVA Seat Sharing : मविआच्या जागा वाटपात ठाकरेंची शिवसेना अन् काँग्रेसमध्ये मुंबईतील तीन जागांवरुन रस्सीखेच, मतदारसंघ कुणाला मिळणार?
मुंबईतील तीन जागांवर ठाकरेंच्या सेनेचा अन् काँग्रेसचा दावा, मविआच्या जागा वाटपात मुंबईत सर्वाधिक जागा कोण लढणार? 
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024 : 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी लोकांचा कल कुणाला? मतमोजणीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024 : 370 कलम हटवल्यानंतर काश्मिरी लोकांचा कल कुणाला? मतमोजणीचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
Embed widget