जालन्यात पोस्टाद्वारे मागवलेल्या 22 तलवारी जप्त, तलवारींमागचा मास्टरमाईंड कोण? पोलिसांचा तपास सुरू
Jalna Crime : पंजाबमधील अमृतसरमधून या तलवारी मागवण्यात आल्या असून आरोपीचा उद्देश काय याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
जालना : पोस्टाद्वारे मागवलेल्या 22 तलवारी जालना पोलिसांनी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य पोस्ट ऑफिसच्या परिसरात छापा टाकला आणि आरोपीला अटक केल. पंजाबमधील अमृतसरमधून या तलवारी कशाच्या उद्देशाने मागवण्यात आल्या आहेत याचा तपास पोलिस करत आहेत.
जालन्यात पोस्टाच्या माध्यमातून तलवारी येणार असल्याची माहिती पोलिसांन मिळाली आणि पलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी जाळं टाकलं. आरोपीला पकडल्यानंतर त्याच्या ताब्यातून पोलिसांनी पोस्टाद्वारे आलेले पार्सल तपासले. त्यामध्ये तब्बल 22 तलवारी आढळून आल्या. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात या तलवारी कुठल्या उद्देशाने आणण्यात आल्या आहेत याचा तपास पोलिस घेत आहेत.
पंजाबमधून तलवारी मागवल्या
या तलवारी आरोपीनं पंजाबच्या अमृतसरहून विक्रीच्या उद्देशानं मागवल्याची शक्यता आहे. मात्र खरंच या तलवारी विक्रीच्या उद्देशानं मागवल्या की दुसरा काही हेतू होता याचा तपास पोलिस करत आहेत. जालना पोस्ट ऑफिसबाहेर तलवारी घेऊन जात असताना पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
जालन्यात आधीच मराठा आरक्षण आंदोलन आणि ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राहण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. त्याचवेळी अशा असमाजिक तत्वांमुळे जिल्ह्यातील परिस्थिती चिघळू नये याकडे पोलिसांनी लक्ष दिलं आहे.
ही बातमी वाचा: