एक्स्प्लोर

Jalna OBC Sabha : जालन्यात ओबीसींचा महाएल्गार; भुजबळ, वडेट्टीवार, जानकर सभास्थळी, 'या' आहेत प्रमुख मागण्या

Jalna OBC Sabha : मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती देखील या सभेत असणार आहे. त्यामुळे या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागला आहे.

Jalna OBC Sabha : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देऊ नयेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आज जालन्यातील अंबडमध्ये भव्य ओबीसी सभा (OBC Sabha) आयोजित करण्यात आली आहे. या सभेला राज्यभरातील महत्त्वाचे ओबीसी नेते हजर राहणार आहेत. ओबीसी सभास्थळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal),  विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), पोहोचले आहेत.  त्यामुळे या सभेकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. सोबतच राज्यातील अनेक महत्वाचे ओबीसी नेते देखील या सभेला उपस्थित राहणार आहे. 

'या' आहेत प्रमुख मागण्या...

  • ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा समावेश करु नये
  • बिहारच्या धर्तीवर राज्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी
  • मराठा समाजाला दिलेली खोटी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करावी
  • खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • 7 सप्टेंबर 2023 रोजीचा कुणबी प्रमाणपत्रे देण्याचा जीआर रद्द करावा
  • बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन दाखल्यांचं वाटप करावं
  • धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी

मनोज जरांगेंच्या बालेकिल्ल्यात सभा

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सुरुवात जालन्यातील आंतरवाली सराटी गावातून झाली. आता ओबीसींची सभा देखील जालना जिल्ह्यातच होत आहे. विशेष म्हणजे आंतरवाली सराटी गावापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर ही सभा होत आहे. त्यामुळे, मनोज जरांगे यांच्याच बालेकिल्ल्यात सभा घेऊन, मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यास आमचा विरोध असल्याचा संदेश ओबीसींकडून देण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

सरसकट मराठा आरक्षणाला विरोध... 

महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. तर, हाच विरोध दर्शवण्यासाठी आज अंबडमध्ये ओबीसींची जाहीर सभा होत आहे. या सभेला राज्यातील प्रमुख ओबीसी नेते हजर राहणार आहेत. तसेच, आपल्या भाषणातून सरसकट मराठा आरक्षणाला या ओबीसी नेत्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. 

सभेला 'या' नेत्यांची उपस्थिती?

सभेला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar), महादेव जानकर (Mahadev Jankar), गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), शिवाजीराव चोथे (Shivajirao Chothe) यासह ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) आदींची उपस्थितीत असणार आहे.

OBC Sabha: 'ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणं आमचं कर्तव्य', जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunil Tatkare :लोकसभेला मला फसवलं,यावेळी तसं करु नका;मुस्लिम कार्यकर्त्यांना तटकरेंचे चिमटेMrunali Raje Bhosale Satara:बाबांसाठी छत्रपतींची लेक मैदानात ;Shivendrarajeसाठी मृणालीराजेंचा प्रचारAjit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dilip Walse Patil : तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
तर काही ना काही करून गणित घालावं लागेल! शरद पवारांच्या मानसपुत्राकडून समीकरण बदलाचे संकेत?
Mumbai Suburban District Vidhan Sabha Election: मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
मुंबई उपनगरात कोणता पक्ष सरस ठरणार? 26 मतदारसंघ ठरवणार मुंबईच्या राजकारणाची दिशा
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Wardha Assembly Election : वर्धा जिल्ह्यातील लढती, कोण-कोण भिडणार? 4 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
शरद पवारांचा उमेदवार म्हणाला, पोरांची लग्न लाऊन देतो; धनंजय मुंडे म्हणाले, तुमच्या माजी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचं तरी लग्न झालंय का?
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Embed widget