Jalna News : निधी वाटपात भाजप नेते शिवसेनेला डावलतायत; शिंदे गटाच्या नेत्यांच्या आरोपाने खळबळ
Jalna News : जालन्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे नेते तथा पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांना घेराव घालून जाब विचारला होता.
Jalna News : महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) सरकार असतांना तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विकास निधी देतांना शिवसेनेला (Shiv Sena) सतत डावलत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 पेक्षा आमदारांनी बाहेर पडत भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. मात्र, आता भाजपकडून (BJP) देखील शिंदे गटाला निधी वाटपात डावलण्यात येत असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी केला आहे. विशेष म्हणजे याच वादावरून सोमवारी जालन्यात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपचे नेते तथा पालकमंत्री अतुल सावे (Atul Save) यांना घेराव घालून जाब विचारला होता.
'एबीपी माझा'शी बोलतांना अर्जुन खोतकर म्हणाले की, निधी मिळत नसल्याने याचा जाब विचारण्यासाठी काल आमचे कार्यकर्ते सावे यांच्याकडे गेले होते. पण कोणत्या गोष्टीचा जाब विचारूच नाही हे फारच झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी काही सूत्री ठरवून दिली आहे, त्याप्रमाणे खालचे लोकं वागत नसेल तर त्यांना जाब विचारण्यासाठी गेल्याने ते भडकले. तर सावे यांनी जे काही वक्तव्य केले आहे ते अत्यंत खोटे आहे. निधी दिल्याचं म्हणत असतील तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. निधी बाबत ते सांगतात वेगळं आणि देण्यात आलेला निधी वेगळा आहे. त्यांनी आम्हाला 7 कोटी निधी दिला. शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला 40 ते 45 कोटी निधी मिळायला पाहिजी होता. मात्र, त्यांनी सात-आठ कोटीत गुंडाळून टाकले. त्यामुळे हा सर्व प्रकार निश्चितच राग आणणारा असल्याने आमचे लोकं जाब विचारण्यासाठी गेले होते असं खोतकर म्हणाले आहे.
मुख्यमंत्री यांना याबाबत माहिती देणार...
याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते काल जेजुरीला असल्याने बोलणं होऊ शकले नव्हते. पण, योग्य माध्यमातून त्यांच्या कानावर हा विषय मी घालणार आहे. इतर राज्यात काय परिस्थिती आहे माहित नाही, पण जालना जिल्ह्यात निधी देतांना भाजपकडून शिवसेनेला (शिंदे गट) डावलण्यात जात आहे. आम्ही निघी लोकांच्या साठी मागत आहोत. आमच्या घराच्यासाठी हा निधी नाही मागत. जे काही वरच्या पातळीवर ठरलं आहे, त्यानुसारच सर्व काही व्हायला पाहिजे एवढीच आमची विनंती असणार असल्याचे खोतकर म्हणाले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: