एक्स्प्लोर

Jalna Idol Theft Case : मूर्ती चोरीची माहिती देणाऱ्याला 25 हजारांचं बक्षीस, रामाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर करत पोलिसांचं आवाहन

Jalna Idol Theft Case : समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरणारे चार दिवसांनंतरही मोकाट आहेत. आता या प्रकरणात माहिती देणाऱ्यास जालना पोलिसांनी 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

Jalna Idol Theft Case : जालना (Jalna) इथे समर्थ रामदास यांचं (Samarth Ramdas) जन्मस्थान असलेल्या जांब समर्थ गावात, श्रीराम मंदिरातील मूर्ती चोरीच्या घटनेला तीन दिवस उलटून चौथा दिवस उजाडला तरीही चोर अजूनही मोकाट आहेत. मूर्ती चोरणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसावर दबाव वाढत आहे. त्यामुळेच आता या प्रकरणात माहिती देणाऱ्यास जालना पोलिसांनी 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

दरम्यान जालना पोलिसांनी माहिती देणाऱ्यास 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केल्याचं गाण्याच्या माध्यमातूनही सांगण्यात आलं. जालन्यातील पोलीस कर्मचारी योगेश गायके यांनी सोशल मीडियावर रामाच्या गाण्याचा व्हिडीओ शेअर केला असून, त्यात या चोरीविषयी माहिती देणाऱ्यास बक्षीस देणार असल्याचं सांगितलं आहे.

समर्थांच्या देवघरातील श्रीराम मंदिरातल्या राम, सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तसंच हनुमानाच्या मूर्ती 22 ऑगस्ट रोजी चोरीला गेल्या होत्या होत्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांच्या सहा पथकाकडून आजवर 25 ते 30 जणांची कसून चौकशी करण्यात आली. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची देखील पोलिसांकडून तपासणी करण्यात आली आहे.

दुर्मिळ आणि ऐतिहासिक मूर्तींची चोरी
घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ गावात 450 वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक मूर्तींची चोरी झाली. समर्थांच्या देवघरातील त्यांचा स्पर्श झालेल्या राम सीतेच्या मूर्ती चोरीला गेल्या. समर्थांचं जन्मस्थान म्हणून जांब समर्थ गाव प्रसिद्ध आहे. परंतु या मंदिरातील ऐतिहासिक ठेवा आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या समर्थांच्या देवघरातील राम मंदिरातील देवच चोरांनी चोरुन नेले. या मंदिराचे पुजारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी नियमितपणे पूजेसाठी आले असता त्यांना धक्काच बसला. पूजा करत असलेल्या तसंच त्यांचे वडिलोपार्जित देवघरातील अनेक मूर्ती गाभाऱ्यातून गायब झालेल्या दिसल्या आणि ही चोरीची घटना उघड झाली.

पोलिसांच्या माहितीनुसार चोरांनी अंदाजे पहाटे दोन ते तीनच्या सुमारास ही चोरी केली असावी. चोरीचा प्रकार देखील चक्रावून सोडणारा आहे. चोरांनी चोरी करताना जवळच एका खांबावर अडकवलेली चावी घेतली. त्या चावीने कुलूप उघडून गाभाऱ्यात प्रवेश केला, ज्यात त्यांनी मौल्यवान अशा पंचधातूंच्या मूर्ती घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे, जाताना चावी पुन्हा त्याच जाग्यावर नेऊन ठेवली.

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला, विधानसभेत पडसाद

कोणकोणत्या मूर्ती चोरीला गेल्या?

1) 'श्रीराम पंचायतन' मूर्ती चोरीला गेली. राम ,लक्ष्मण, सीता, भरत ,शत्रूघ्न अशा एकत्रित मूर्ती असलेले पंचधातूचे पंचायतन चोरीला गेले. साक्षात सूर्यनारायणाने समर्थांचे वडील सूर्याजी पंत यांना हे पंचायतन दिल्याची आख्यायिका सांगितली जाते.

2) दुसरी मूर्ती श्रीराम ,सीता आणि लक्ष्मण यांची एकत्रित असलेली स्वतः समर्थांनी स्थापित केलेली मूर्ती होती. स्वतः समर्थांच्या देवघरात ते या मूर्तीची पूजा करत असत. साधारण 30 किलो वजनाची ही पंचधातूची मूर्ती आहे.

3) पंचधातूच्या हनुमानाच्या दोन मूर्ती. दीड ते दोन फूट उंचीच्या आणि दहा किलो वजनाच्या या मूर्ती.

4) भिक्षेच्या वेळी समर्थ बाळगत असलेल्या पंचधातूची पाच इंचाची हनुमानाची मूर्ती.

5) राम-लक्ष्मण-सीतेसमोर ठेवलेली जमुवंतची पंचधातूंची मूर्ती.

गृहमंत्र्यांकडून सखोल तपासाचे आदेश
पोलिसांनी या प्रकरणांमध्ये 22 ऑगस्टच्या सकाळपासूनच तपासणी सुरु केली. पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी भेट देऊन चोरांचा शोध घेण्यासाठी सहा पथकं स्थापन करुन ती शोधासाठी रवाना केली आहेत. दरम्यान सभागृहात देखील माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूने चौकशी करत असून एवढ्या सभ्यपणे साक्षात देवांची चोरी करणाऱ्या चोरांचा शोध घेत आहेत. आता या प्रकरणात माहिती देणाऱ्यास जालना पोलिसांनी 25 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

संबंधित बातम्या

Jalna News : देवा तुला शोधू कुठे? समर्थ रामदासांच्या देवघरातील प्राचीन मूर्ती चोरणारे अजूनही मोकाट

समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला, 450 वर्षांपूर्वीच्या मूर्ती चोरीला, विधानसभेत पडसाद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget