Jalna Crime News : नात्याला काळीमा फासणारी घटना, बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार
Jalna Crime News : या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) संशयिताविरुध्द बाल लैंगिक अत्याचार व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना : जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, बापानेच पोटच्या 12 वर्षीय मुलीवर अत्याचार केला आहे. या संतापजनक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) संशयिताविरुध्द बाल लैंगिक अत्याचार व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांनी (Police) नराधम बापाला अटक देखील केली आहे.
अधिक माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई -वडिलांसह शहरातील एका भागात राहते. दिवाळीच्या चार ते पाच दिवस अगोदर पीडितेची आई किराणा सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती. दरम्यान, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचा बाप हा पलंगावर झोपला होता. तर पीडित अल्पवयीन मुलगी ही खाली झोपली होती. त्याचवेळी नराधम बापाने लैंगिक अत्याचार करून तिचा विनयभंग केला. त्यानंतर हा प्रकार कुणाला सांगितला तर जिवे मारण्याची धमकी दिली.
मुलीने घडलेला प्रकार आईला सागितला
दरम्यान, सोमवारी सायंकाळी पीडित मुलगी घरी एकटी राहत नाही, असे म्हणत रडू लागली. आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने घडलेला प्रकार आईला सागितला. त्यानतर घरातील एका ज्येष्ठला याबाबत माहिती देण्यात आली. आईने पीडित मुलीला सोबत घेऊन तालुका ठाणे गाठले. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बापाविरुध्द कलम 354, 506, बालकांचे लैगिंक अपराधांपासून संरक्षण 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयितास अटक केली असून, पुढील तपास सुरु आहे.
बीड जिल्ह्यात आठ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार
दरम्यान, बीड जिल्ह्यात देखील आठ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बीड शहरातील एका भागातील रहिवासी असलेली आठ वर्षीय पिडीत मुलगी आपल्या कुटुंबीयान सोबत राहते. तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पिडीत मुलगी घराजवळ खेळत होती. याचवेळी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय असलेल्या तीन मित्रांनी तिला जवळच असलेल्या नदीच्या परिसरातील एका पडक्या घरामध्ये घेऊन गेले. त्यानंतर या मुलीवर आळीपाळीने अत्याचार केला. याचवेळी, पीडितेने केलेला आरडाओरडा ऐकून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. तसेच अल्पवयीन मुलांच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली गेली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मुलीवर दोघांचा अत्याचार; आरोपीच्या अटकेसाठी पैठणमध्ये मोर्चा