मोठी बातमी! जालना जिल्ह्यातील 350 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध; पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे आदेश
Jalna Water Shortage : जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त एकुण 350 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश जारी केले आहेत.
जालना : यंदा मराठवाड्यात अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील अनेक गावात देखील पाणी टंचाई पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संभाव्य पाणी टंचाईग्रस्त एकुण 350 गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र भूजल पिण्याच्या पाण्याच्या प्रयोजनासाठी विनिमय अधिनियम -2009 अन्वये दरवर्षी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांचा अभ्यास केला जातो. सप्टेंबर अखेरचे पर्जन्यमान आणि सप्टेंबर महिन्यातील सरासरी पर्जन्यमान यांच्या तुलनेत झालेली घट आणि वाढ याद्वारे अभ्यास करुन, ऑक्टोबर महिन्यातील निरीक्षण विहिरीच्या पाण्याच्या पातळीचा अभ्यास केला जातो. त्याप्रमाणे वरिष्ठि भूवैज्ञानिक यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या कालावधीत 138 गावे, आणि जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत 59 गावे, एप्रिल ते जून 2024 या कालावधीत 153 गावे असा जालना जिल्याऱ्तील संभाव्य पाणी टंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला आहे. या सर्व कालावधीत संभाव्य पाणी टंचाईग्रस्त अशी एकुण 350 गावे दर्शविण्यात आली आहेत. त्यामुळे या गावात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घालण्यात आले आहे.
अन्यथा कारवाई केली जाईल...
तसेच, या आदेशाचा भंग केल्यास महाराष्ट्र भूजल अधिनियम-2009 मधील तरतुदीनूसार योग्य ती दंडात्मक कार्यवाही करण्याचे अधिकार संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना आदेशान्वये देण्यात आले आहेत. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत टंचाई भासणारी गावं
1 अंबड चिकनगाव देशगव्हाण माहेर भाईगाव आवा अंतरवाला आवा बदापूर
2 अंबड नागझरी साडेसावंगी मठ पिंपळगाव गोला बठान खु हरतखेडा कातखेडा
3 अंबड बारसवाडा डोमेगाव कोळी सिरसगाव शहापूर भोकरवाडी जामखेड कानडगाव
4 अंबड लासूरा नागोबाचीवाडी वाडी लासुरा बनटाकळी सुखापुरी झिरपी डावरगाव
5 अंबड कौडगाव लखमापूर पांगरी कुक्कडगाव रेवलगाव बेलगाव
6 अंबड डोमलगाव टाका रामगव्हाण बु. वडीगोद्री
7 घनसावंगी दैठणा बु. गाढेसावरगाव मुढेगाव
8 घनसावंगी पांगरा पांगरा तांडा
9 घनसावंगी बोर रांजणी येवला यावल पिंप्री यावल पिंप्री तांडा पारडगाव
10 घनसावंगी चित्रवडगाव रांजणीवाडी कृष्णपूरवाडी रांजणी देवळी अंबड देवळी परतूर
11 घनसावंगी अंतरवाला बु. जिरडगाव लमाणवाडी कंडारी परतूर
12 घनसावंगी गुणनाईक तांडा जांब समर्थ
13 घनसावंगी नागोबाचीवाडी कुंभार पिंपळगाव मुर्ती लिंबी श्रीपत धामणगाव
14 जाफ्राबाद वरुड खु.
15 जाफ्राबाद तोंडोली
16 जालना लोंढ्याचीवाडी खनेपुरी मजरेवाडी भाटेपुरी सालगाव जालना
17 जालना हातवन वाडीवाडी पाचनवडगाव रोहनवाडी मालेगाव खु माळशेंद्रा
18 जालना भातखेडा खरपुडी कचरेवाडी हडप रामनगर बापकळ
19 जालना हिस्वन बु. हिस्वन खु
20 जालना गवळी पोखरी नंदापूर थार
21 परतूर बाबई डोल्हारा एकरुखा कोरेगाव नागापूर मापेगाव खु.
22 परतूर सिंगोना शेलवाडा वलखेड
23 परतूर सातोना खु सातोना बु. उस्मानपूर खांडवी सिरसगाव चिंचोली
ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 पर्यंत टंचाई भासणारी गावं
24 बदनापूर देवगाव कस्तुर वाडी कडेगाव कुसळी रोशनगाव
25 बदनापूर तळणी लोधेवाडी डावरगाव
26 बदनापूर भराडखेडा हलदोला मात्रेवाडी
27 बदनापूर बावणे पांगरी
28 भोकरदन वाडी बु वाडी खु. आलापूर मलकापूर प्रल्हादपूर रामपूर बु
29 भोकरदन बोरगाव तारु हसनाबाद टाकळी बाजड
30 भोकरदन सावंगी अवघडराव
31 भोकरदन लतीफपूर तळेगाव टाकळी हिवर्डी खडकी देऊळगाव ताड
32 भोकरदन चांदई ठोंबरी बनेगाव नळणी बु
33 भोकरदन कोठारा जैनपूर सिरसगाव मंडप डावरगाव
34 भोकरदन वलसा डावरगाव
जानेवारी ते मार्च 2024 पर्यंत टंचाई भासणारी गावं
1 अंबड पिंपरखेड खु. घुंगर्डे हदगाव इंदलगाव
2 जाफ्राबाद भोरखेडा आसई
3 जाफ्राबाद बोरखेडी गायकी गारखेडा टाकळी
4 जालना पोखरी सिंगाडे
5 परतूर दैठणा बु हातडी खांडवी वाडी
6 परतूर पांडेपोखरी आसनगाव डोणवाडी अंतरवाला वाहेगाव सातारा लांडकदरा तांडा
7 परतूर आनंदगाव पळशी आष्टी
8 बदनापूर बाजार वाहेगाव वाकुळणी नानेगाव
9 बदनापूर गेवराई
10 भोकरदन अन्वा अन्वापाडा करळवाडी कुकडी दानापूर करजगाव कठोरा बाजार
11 भोकरदन देहेड गोद्री ताडकळस वडशेद सिपोरा बाजार तळणी
12 भोकरदन भोकरदन पेरजापूर सुभानपूर कोदोली टाकळी भोकरदन
13 भोकरदन कोसगाव पिंपळगाव (रेणुकाई) रेलगाव कोठा कोळी लेहा पारध खु सेलुद
14 भोकरदन भोरखेडा धावडा पोखरी वडोद तांगडे पद्मावती वालसावंगी पारध बु
15 भोकरदन नळणी खु.
16 मंठा अंभोडा कदम
एप्रिल ते जुन 2024 पर्यंत टंचाई भासणारी गावं
1 अंबड रोहीलागड लोणार भायगाव
2 अंबड खेडगाव
3 अंबड धनगर पिंपळगाव कर्जत मार्डी हस्त पोखरी शिराढोण वाडी शिराढोण धनगर पिंपरी
4 अंबड लालवाडी पारनेर शेवगा सारंगपूर
5 अंबड पानेगाव
6 अंबड दहीगव्हा ण खु. रुई ताडहदगाव ढालसखेडा
7 मंठा साडेगाव
8 घनसावंगी मानेपुरी राणी उंचेगाव कृष्णनगर चापडगाव अंतरवालीदाई देवडी हादगाव
9 घनसावंगी माहेरजवळा
10 घनसावंगी साकळगाव हातडी मासेगाव
11 घनसावंगी बोदलापुरी मोहपुरी सिद्धेश्वर पिंपळगाव बाचेगाव वाडी रामसगाव राहेरा
12 घनसावंगी दैठणा ख. जोगलादेवी तीर्थपुरी
13 घनसावंगी मुरमा बळेगाव राजेगाव ढाकेफळ दहीगव्हा ण बु. पाडळी बु. पाडळी खु
14 घनसावंगी अरगडेगव्हाण राजूरकरकोठा
15 घनसावंगी मंगरूळ मुद्रेगाव बानेगाव भोगगाव सौंदलगाव बु. रामसगाव शेवता
16 घनसावंगी एकरुखा राजा टाकळी शिवणगाव उक्कडगाव
17 जाफ्राबाद वरखेडा विरो
18 जाफ्राबाद जाफ्राबाद सावरखेडा
19 जाफ्राबाद दहिगाव गणेशपूर पोखरी बुटखेडा भातोडी नळविहिरा
20 जाफ्राबाद गोंधनखेडा खामखेडा
21 जाफ्राबाद डावरगाव डोणगाव सावंगी टेंभुर्णी
22 जाफ्राबाद वरखेडा (फिरंगी) नांदखेडा
23 जाफ्राबाद खानापूर
24 जाफ्राबाद कुंभारझरी निवडुंगा
25 जालना रेवगाव इस्लामवाडी
26 जालना वाघरूळ जहांगीर पोखरी सिंदखेड
27 जालना सोमनाथ नाव्हा वरुड
28 जालना खोडेपुरी नसडगाव
29 जालना अंतरवाला सिंदखेड सावंगी तलाव पाहेगाव चितळी पुतली नेर शेवगा
30 जालना बोरगाव
31 परतूर लिंगसा सृष्टी तांडा तोरणा मावपाटोडा येनोरा
32 परतूर वाघाडी कंडारी वाटूर
33 परतूर श्रीधर जावळा वैजोडा
34 बदनापूर वरुडी
35 बदनापूर कंडारी खु. दावलवाडी भिलपुरी बु. देव पिंपळगाव
36 बदनापूर चनेगाव
37 भोकरदन वाकडी भायडी निंबोळा
38 भोकरदन मालखेडा
39 भोकरदन गोशेगाव
40 भोकरदन बरंजाळा (लोखंडे) समर्थ नगर तडेगाव तडेगाव वाडी
41 भोकरदन जानेफळ दाभाडी पिंपळगाव (सुतार)
42 भोकरदन बामखेडा
43 भोकरदन केदारखेडा खापरखेडा
44 भोकरदन नांजा कुंभारी
45 भोकरदन खंडाळा
46 मंठा धोंडी पिंपळगाव
47 मंठा कोकरंबा वडगाव सरहद
48 मंठा तळणी
49 मंठा टाकळखोपा इंचा कानडी
50 मंठा गणेशपूर
51 मंठा खारी आर्डा रामतीर्थ पांगरी बु
52 मंठा केदारवाकडी हेलस हेलसवाडी रानमळा
53 मंठा लिंबेवडगाव पाटोदा खु. सोनूनकरवाडी
इतर महत्वाच्या बातम्या:
चिंता वाढली! बीडच्या 242 गावांमध्ये भीषण पाणीटंचाईची शक्यता, वैज्ञानिकांनी पाठवला सरकारला अहवाल