एक्स्प्लोर
Advertisement
जालन्यातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार, 23 दिवसानंतर सुटका
या मुलीच्या जबाबावरून मुलीसोबत अपहरणकर्त्यांनी अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींवर अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जालना : जालन्यातून अपहरण झालेल्या एका 13 वर्षांच्या मुलीसोबत हिंगोलीत अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं आहे. तेरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन हिंगोली जिल्ह्यात डांबून ठेवून तिच्यावर बलात्कार केल्याच्या संदर्भात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
जालन्यातून 13 नोव्हेंबरला एका तेरा वर्षांच्या मुलीचं अपहरण झालं होतं. मात्र अनेक दिवस उलटूनही मुलीचा शोध लागत नव्हता. अखेर पोलीस अधीक्षकांच्या सूचने नंतर पोलिसांनी तपास जलदगतीने वाढवला. दरम्यान सदर मुलीचे अपहरण हे तिच्या घराशेजारी राहणाऱ्या दोन महिला आणि हिंगोली जिल्ह्यातील नातेवाईक असलेल्या एका आरोपीने केल्याची खात्रीशीर माहिती खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली. त्यानंतर या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली. या मुलीला हिंगोली जिल्ह्यात एका शेत वस्तीत ठेवलं असल्याचं आरोपींनी सांगितलं. यानंतर पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी जावून मुलीची सुखरूप सुटका केली. दरम्यान या मुलीच्या जबाबावरून मुलीसोबत अपहरणकर्त्यांनी अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींवर अपहरण, बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अल्पवयीन मुलगी 13 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली म्हणून तक्रार नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा पोलीस शोध घेत होते. या प्रकरणी हिंगोली जिल्ह्यातील आरोपी दत्ता धनगर याच्यासह दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. या मुलीची विक्री करण्याचा आरोपींचा डाव होता का? या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत.
शुक्रवारी रात्री उशीरा जालना जिल्ह्यतील दोन महिलांना अटक केली आहे. या पूर्वी मुलगी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. त्यात बलात्काराचे कलम वाढविण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कोठाळे यांनी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
निवडणूक
निवडणूक
Advertisement