एक्स्प्लोर

जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात! आर्थिक गैरव्यवहार झाल्याचाही संशय?

जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. सोबतच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Pune crime news: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्या काळ्या कारनाम्यांचे किस्से आता बाहेर येत आहेत. अशातच आता जालिंदर सुपेकर यांच्या कारागृह महानिरीक्षक पदाच्या कार्यकाळातील अनेक बदल्या संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहे. सोबतच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आधी तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील बदल्यांचे अधिकार विभागीय कारागृह उपमहानिरीक्षकांना होते. मात्र सुपेकरांनी विभागीय उपमहानिरिक्षकांचे हे अधिकार काढत ते स्वतःकडे घेतले. त्यानंतर 2023 या एकाच वर्षात 14 वेळा विविध बदल्यांचे आदेश निघाले असल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, सुपेकर यांच्या कार्यकाळात एकूण जवळपास 450 बदल्या झाल्याची माहिती समोर आली आहे. या बदल्यांमध्ये तुरुंग अधिकारी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी, वरिष्ठ लिपिक कार्यालयीन अधीक्षक आणि तांत्रिक कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यातील 205 बदल्यांमध्ये संशयास्पद आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यासाठी सुपेकर एकाच विभागात कार्यरत राहण्याची आधीची 10 वर्षाची मुदत घटवत ती  6 वर्षांवर आणली असल्याचे ही बोललं जात आहे. या कार्यरत काळाची मुदत घटवल्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल्यांचे व्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

भाजप आमदार सुरेश धस यांनीही केले होते गंभीर आरोप 

काही दिवसापूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी ही  जालिंदर सुपेकर (Jalindar Supekar) यांच्यावर गंभीर आरोप केले होते.  जालिंदर सुपेकर  यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपये मागितल्याचा आरोप त्यांनी केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी पुण्यातील एका सावकाराच्या वकिलांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) (Special IG Prisons) या पदावर कार्यरत होते. या काळात त्यांनी अमरावती येथील कारागृहात असणाऱ्या नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड यांच्याकडून जामीन मिळवून देण्याच्या मोबदल्यात 550 कोटी रुपये मागितल्याचा आरोप ॲडव्होकेट निवृत्ती कराड यांनी केला आहे. यासंदर्भात आपण नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याचेही त्यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.

जालिंदर सुपेकरांची बदली, डिमोशनही झालं

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाशी संबंध आढळून आल्यानंतर गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्यावर कारवाई केली होती. जालिंदर सुपेकर हे सध्या विशेष पोलीस महानिरिक्षक कारागृह व सुधार सेवा या पदावर कार्यरत होते. आता तिथुन त्यांची बदली पदावनती करुन उप महासमादेशक होमगार्ड या पदावर पाठवण्यात आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना

व्हिडीओ

Tejasvee Ghosalkar PC : ठाकरेंना जय महाराष्ट्र, तेजस्वी घोसाळकरांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
Nitin Nabin BJP President : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारच्या नितीन नवीन यांची निवड
Australia Sydney Terrorist Attack : ऑस्ट्रेलियातल्या सिडनीत दहशतवादी हल्ला Special Report
John Cena Retirement : जॉन सीनाची WWE रेसलिंगमधून निवृत्ती, कारण काय? Special Report
Nagpur Slum Area : झोपडपट्टी सुधारणेचं नागपूर मॉडेल Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
चॉकलेटचे आमिष दाखवलं; निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला, तिच्याच पँटने गळा आवळला, रात्री अकरा वाजता कंपनीत कामाला गेला अन्...
Tejasvee Ghosalkar Resignation: ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
ठाकरेंची साथ सोडणार, तेजस्वी घोसाळकर भाजपामध्ये प्रवेश करणार; नेमकं कारण काय?, भावूक पोस्ट करत मनातलं सगळं सांगितलं!
Nashik Crime: आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
आनंदाचा सोहळा क्षणार्धात दुःखात बदलला! हळदीच्या कार्यक्रमातच टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, नेमकं काय घडलं?
Pune Crime News: खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
खाजगी क्लासमध्ये लहान मुलांमध्ये गँगवार, शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला; उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील खळबळजनक घटना
Tukaram Mundhe : एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...; तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले
एका प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा? नागपुरात काम करताना काही लोकांची मनमानी होऊ दिली नाही, म्हणून...;  तुकाराम मुंढेंचा घणाघात
Dhurandhar BO Day 10: 'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?
'धुरंधर'नं दुसरा आठवडा गाजवला, 'पुष्पा 2', 'छावा'लाही पछाडलं; आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती नोटा छापल्यात?
Dr. Anjali Nimbalkar : विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
विमानाने उड्डाण घेताच अमेरिकन महिलेची मृत्यूशी झुंज, 30 हजार फूट उंचीवर डॉ. अंजली निंबाळकर देवदूतासारख्या धावल्या
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Embed widget