एक्स्प्लोर

Rupali Chakankar vs Rohini Khadse : सीडी दाखवून राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला, तोंडात सोन्याचा चमचा, बापाच्या वशिल्यामुळे पदं मिळाली, रूपाली चाकणकरांचा रोहिणी खडसेंवर पलटवार

Rupali Chakankar vs Rohini Khadse : रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली होती.

जळगाव : रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, अशी टीका रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी केली होती. यावर आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यावर पलटवार केला आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे रूपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. 

विधानसभा निवडणुका (Vidhan Sabha Election) जवळ येत असल्याने राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, अशी टीका केली होती. यावरून रूपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांना डिवचले होते. 

रूपाली चाकणकर यांचा रोहिणी खडसेंवर पलटवार 

आता रोहिणी खडसे यांच्या वक्तव्याचा रुपाली चाकणकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. रुपाली चाकणकर म्हणाल्या की, आमच्याकडे सीडी आहे असे सांगून राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला व अजूनही ती सीडी बाहेर बाहेर आलेली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. ते आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नाही. अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणारे व इतरांवर टीका करणार्‍यांवरून त्यांची मानसिकता व बुद्धिमत्ता किती आहे? हे कळून येत आहे. वडिलांमुळे सोन्याचा चमचा घेऊन स्वतःचं कर्तुत्व नसताना वडिलांच्या नावावर पद मिळवलं, त्यांना टीका करण्याचा अधिकार नसल्याचे नाही, असा पलटवार त्यांनी केलाय. तर लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून भाजपचा प्रचार केल्याचा आरोपही रूपाली चाकणकर यांनी रोहिणी खडसेंवर केला आहे. आता रोहिणी खडसे नेमकं काय प्रयुत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

नेमकं काय म्हणाल्या होत्या रोहिणी खडसे? 

रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना म्हटलं होतं की, रुपाली चाकणकर यांनाच आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. सुप्रिया सुळेंवर टीका करणे म्हणजेच आकाशाकडे थुंकण्यासारखे आहे. त्यामुळे पहिले आमदार किंवा नगरसेवक होऊन दाखवा आणि मगच नेत्यांवर टीका करा, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले होते.

आणखी वाचा 

Rohini Khadse : 'सरकारला वाटतंय महिलांचं मन फक्त पैशात अडकलंय, पण...'; लाडकी बहीण योजनेवर रोहिणी खडसेंची सडकून टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: नेत्यांच्या घोषणा हवेतच विरल्या, चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेना; जळगावात 3 वर्षांपासून कोर्टाच्या फेऱ्या, फास्टट्रॅक कुठंय?
नेत्यांच्या घोषणा हवेतच विरल्या, चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेना; जळगावात 3 वर्षांपासून कोर्टाच्या फेऱ्या, फास्टट्रॅक कुठंय?
Rohit Pawar: चिमुकल्या मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नाही, राजकारणात येऊन कुठेतरी फसलो किंवा चुकलो; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत, म्हणाले...
चिमुकल्या मुलींना आणि महिलांना न्याय देता येत नाही, राजकारणात येऊन कुठेतरी फसलो किंवा चुकलो; रोहित पवारांनी व्यक्त केली खंत, म्हणाले...
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
जळगाव हादरलं, प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल; पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
Gayatri Bhangale: शरद पवार गटाला मोठा धक्का, भाजप मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंची निवड रद्द; नेमकं कारण काय?
शरद पवार गटाला मोठा धक्का, भाजप मंत्र्यांच्या पत्नीचा पराभव करणाऱ्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंची निवड रद्द; नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Chitra Wagh Mumbai : घरातही मुली सुरक्षित राहिलेल्या नाहीत, अत्याचार कोण करतंय तर बाप, मामा, भाऊ
Nida Khan Arrested : निदा खान कुठे लपून बसलेली? पोलिसांनी कसा सापळा रचला? पाहा ग्राऊंड रिपोर्ट
Nashik TCS Case : छत्रपती संभाजीनगरमधून निदा खानला अटक, रात्री उशिरापर्यंत कारवाई
Mumbai Watermelon Case : उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू, धक्कादायक माहिती समोर
Tamil Nadu Politics : जुळत नाही आकडा, तामिळनाडूचा तिढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
टीव्हीके प्रमुख विजय सलग तिसऱ्या दिवशी तिढा टाकलेल्या राज्यपालांच्या भेटीला; अवघ्या 15 मिनिटात भेट घेत बाहेर, काय काय घडलं?
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
'Worst of Doing Business'! सौर उर्जेसाठी उद्योगांची कोट्यवधीची गुंतवणूक अन् आता महावितरणकडून ग्रीड सपोर्ट चार्जेसचा तुघलकी फतवा; फिक्स चार्जेसमध्येही कंबरडे मोडले
Suvendu Adhikari: विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
विश्वासू सहकारी ते कट्टर विरोधक! शूभेंदू अधिकारी यांनी अमित शाहांचे पाय पकडताच सगळं बदललं! भाजपची 3 जागांवरून द्विशतकी मजल, ममतांना चॅलेंज करणाऱ्या बंगाली सीएमची कहाणी
Nida Khan TCS: नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
नाशिकमधील TCS धर्मांतर प्रकरणात निदा खानची पोलिस कोठडीत रवानगी; गर्भवती असल्याने आईला दोन वेळेत भेटण्याची परवानगी
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
Video: बिहारमध्ये नोकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांचं आंदोलन, पोलिसांनी भर रस्त्यात तरुणांना पळवून पळवून मारलं, तरुणीला पायाखाली तुडवलं, अनेकांची डोकी फोडली
TVK Chief Vijay: थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
थलपती विजय 'सरकार'ची स्वप्नपूर्ती होणार! राज्यपालांनी दोन दिवस तिढा टाकताच बेरजेचं गणित अखेर जमवून आणलं, तिकडं मल्लिकार्जुन खरगेंनी सुद्धा दिल्लीतून ताकद लावली
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
पश्चिम बंगालसाठी अखेर भाजपने सेनापती निवडला; दोन उपमुख्यमंत्री करणार, कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर शपथविधी सोहळा होणार
DMK Big Decision : इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र 
इंडिया आघाडीला धक्का, द्रमुकचा लोकसभेत काँग्रेससोबत बसायला नकार, द्रमुकच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र
Embed widget