एक्स्प्लोर

'एकनाथ खडसेंची उणीव भासणार, पण रावेरमध्ये लढेंगे और जीतेंगे', रोहिणी खडसेंचे सतीश पाटलांना उत्तर!

Rohini khadse : एकनाथ खडसे हे भाजप वाटेवर असल्याने त्यांची उणीव नक्कीच भासणार आहे. कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे, असे रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे.

Rohini Khadse जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ खडसे यांच्यासोबत त्यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यादेखील भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा होती. मात्र त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्येच राहणे पसंत केले आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री सतीश पाटील (Satish Patil) यांनी रोहिणी खडसे यांना रावेरमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड मिळून देत आपली निष्ठा सिध्द करण्याचे आवाहन केले होते. यावर रोहिणी खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे यांची उणीव भासणार मात्र रावेरमध्ये लढेंगे और जीतेंगे, असे त्यांनी म्हटले आहे. 

रोहिणी खडसे म्हणाल्या की, एकनाथ खडसे यांनी गेली अनेक वर्ष भाजपसाठी (BJP) निष्ठेने काम केले होते. त्याच पद्धतीने मी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सोबत असताना एक निष्ठेने काम करत असून ते करतच राहणार आहे. माजी मंत्री सतीश पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला लीड मिळून द्यावा आणि निष्ठा सिध्द करावी असे म्हटले. सतीश पाटील यांना आपण उत्तर देण्याची आवश्यकता आहे असे आपल्याला वाटत नाही. 

सतीश पाटलांच्या प्रश्नांना शरद पवारांनी उत्तर दिलंय 

कारण त्यांच्या सगळ्या प्रश्नांना पक्षश्रेष्ठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर दिले आहे. मी पक्षासाठी काम करत आहे.  लोक आम्हाला ज्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत ते पाहता आमच्या उमेदवाराचा विजय नक्की होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

संतोष चौधरींमुळे पक्षाला फायदा होणार

त्या पुढे म्हणाल्या की, शरद पवार यांचा जामनेर येथे दौरा झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर उमेदवार न मिळाल्याने नाराज असलेले माजी आमदार संतोष चौधरी (Santosh Chaudhary) हे देखील पुन्हा एकदा उमेदवाराच्या प्रचार करण्यासाठी पुढे आले असल्याने त्याचा पक्षाला फायदा होणार आहे. 

एकनाथ खडसे यांची उणीव भासणार - रोहिणी खडसे

एकनाथ खडसे हे भाजप वाटेवर असल्याने त्यांची उणीव नक्कीच भासणार आहे. कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले आहे.  आज ते इकडे नसल्याने सगळ्यात जास्त उणीव मला भासत आहे. कारण ते माझे वडील आहेत. त्यांचे आशीर्वाद घेऊनच मी राजकारणात आले आहे, आता लढत आहे, शिकत आहे, लढेंगे और जितेंगे. रक्षा ताई आपल्या परिवारातील असल्या तरी ही लढाई कोणत्याही व्यक्तीच्या विरोधातील नाही तर विचारांची लढाई आहे.  त्यामुळे ही व्यक्तीची नाही पक्षांची लढाई असून आम्ही दोन्ही आमच्या पक्षाच्या विचारधारेत काम करत असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Rohini Khadse : आमच्या रक्तात गद्दारी नाही, रोहिणी खडसे कडाडल्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Embed widget