एक्स्प्लोर
Train Accident : कोळसा घेऊन जाणाऱ्या मालगाडीला अपघात, अनेक डबे रुळावरून घसरले, अमळनेर रेल्वे स्थानकाजवळील घटना, पाहा PHOTOS
Railway Accident : अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ कोळशाची वाहतूक करणारी मालगाडी रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे.
Train Accident
1/9

अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडी रेल्वे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे.
2/9

भुसावळकडून नंदुरबारकडे कोळसा घेऊन मालगाडी जात होती.
3/9

ही मालगाडी अमळनेर रेल्वे स्थानकाजवळ पोहोचली असता ती रेल्वे रुळावरून घसरली.
4/9

हा अपघात झाल्याने मालगाडीतील कोळसा मोठ्या प्रमाणावर रेल्वे रुळावर पडल्याचे दिसून येत आहे.
5/9

मालगाडीचे अनेक डबे रुळावरून घसरून पडले आहे.
6/9

यामुळे भुसावळ-सुरत मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
7/9

अमळनेर रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही अंतरावर ही घटना घडल्याने रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
8/9

रेल्वेच्या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
9/9

रेल्वे प्रशासनाच्या वतीने अपघात ग्रस्त मालगाडी बाजूला हटवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
Published at : 15 May 2025 03:59 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
क्रिकेट
























