एक्स्प्लोर

आधी सलीम कुत्तासोबतचे फोटो दाखवले, आता सुधाकर बडगुजरांच्या प्रवेशावर नितेश राणे म्हणतात....

उद्धव ठाकरे यांनी तातडीने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करुन पक्षातील नाराजांना थेट संदेश दिल्याचे बोलले जात आहे.

नागपूर : राज्यात सध्या शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर चांगलेच चर्चेत आले असून नाशिक जिल्ह्यातील राजकीय नाट्याचा अखेर शेवट झाला आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची भाषा बदलली होती. मी पक्षात नाराज आहे, असे त्यांनी उघडउघड बोलायला सुरुवात केली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील अलीकडच्या राजकारणाच्या रिवाजानुसार सुधाकर बडगुजर भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यातच, सुधाकर बडगुजर (Sudhakar badgujar) यांचा निर्णय होण्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी पक्षातून त्यांची हकालपट्टी करत त्यांना धक्का दिला. आता, बडगुजर यांचा भाजप प्रवेश चर्चेत असून भाजप नेत्यांकडूनही त्यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे ज्या भाजप नेत्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांसोबतचे फोटो शेअर केले होते, त्याच भाजपात आता बडगुजर जाणार असल्याने भाजप नेत्यांचीही गोची झाली आहे. एकेकाळी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणे (Nitesh rane) यांनीही यावर सावध प्रतिक्रिया दिली.  

उद्धव ठाकरे यांनी तातडीने सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करुन पक्षातील नाराजांना थेट संदेश दिल्याचे बोलले जात आहे. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून जिल्हाप्रमुखांसह इतर नियुक्त्या झाल्या होत्या. या नियुक्त्या करताना आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही, असे सुधाकर बडगुजर यांनी म्हटले होते. त्यामुळे, आपण नाराज असल्याचे सांगत त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले आहेत. मात्र, बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाला भाजप नेत्यांचाही विरोध दिसून येत आहे. नाशिकमधील आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. तसेच, आपल्यावर आरोप आणि गुन्हे झाकण्यासाठी कुणाला भाजपमध्ये यावे वाटत असेल तर ते चालणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी देखील भूमिका स्पष्ट केली. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बडगुजर भेटले असून प्रवेशाचा अधिकृत निर्णय झालाय अशी काही माहिती नाही. ते जे काही निर्णय घेतील त्यानंतर प्रतिक्रिया देणे योग्य होईल. मात्र, बडगुजरची हकालपट्टी झाली आहे, हे मी ऐकलं आहे. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा आपण बोलू, अशी सावध प्रतिक्रिया नितेश राणेंनी म्हटले. दरम्यान, बडगुजर यांच्यावर नितेश राणेंनी गंभीर आरोप केले होते. तसेच, दाऊदचा माणूस असलेल्या सलीम कुत्तासमवेतच्या पार्टीचे फोटोही त्यांनी यापू्र्वी शेअर केले होते. त्यामुळेच, आता राणेंनी सावधपणे भूमिका मांडल्याचं दिसून येत आहे. 

आदित्य ठाकरेंनी नाव बदललं पाहिजे

आदित्य ठाकरे यांनी आपलं आडनाव ठाकरे बदलून घेतलं पाहिजे, आणि आदित्य खान आणि आदित्य शेख केलं पाहिजे, तेव्हा ते जास्त शोभून दिसेल. बाळासाहेबांचा नातू जर अशा पद्धतीने बोलणार असेल, तर तो ठाकरे आडनाव वापरण्याच्या लायकीचा नाही, अशी बोचरी टीका मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलीय. 

दोन भाऊ म्हणून एकत्र आले तर चांगली गोष्ट

दोन्ही भावांनी काय करावं, हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे, ते सोबत आले काय आणि नाही आले काय, कोणाचेही कुटुंबीय एकत्रित येत असेल, वाद मिटत असेल, तर चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये आम्ही विचार करणे, दखल घेणे, दु:खी होण्याची गोष्ट नाही. ठाकरे कुटुंब म्हणून ते एकत्रित येत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र, ज्यांनी त्यावेळेस ठाकरे कुटुंब तोडले, तेच आता एकत्र येण्याची गोष्ट करत आहे. जेव्हा राज साहेबांनी शिवसेना सोडली, तेव्हा संजय राऊत याची गाडी जाळण्यात आली होती. तेव्हा अनेक लोक शकूनी मामाच्या भूमिकेत होते. आता, तेच लोक दोन्ही भावांनी एकत्रित आले पाहिजे असे लेक्चर देत बसले आहेत, असा खोचक टोला नितेश राणेंनी लगावला. 

दरम्यान, छोट्या तलावामधील मासेमारी कंत्राटावर स्टे लागू आहे. मोठ्या तलावाबद्दलचा स्टे उचलला आहे, त्यामुळे तिथे मसेमारीच्या कंत्राटसाठी स्पर्धा होईल. मासेमारांचा फायदा होईल, त्यातून भारतातील मासेमारीचे उत्पादन वाढेल, असे मंत्री महोदयांनी सांगितलं. 

हेही वाचा

उद्धव ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल, राज ठाकरेंच्या निर्णयाची प्रतिक्षा; शिवसेना-मनसेच्या युतीसाठी कोण घेणार पुढाकार?

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Dharashiv: एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली, 'ते' मेसेज सापडताच पटापट चक्रं फिरली अन्...
एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमापूर्वी पोलिसांना महत्त्वाची टीप लागली, 'ते' मेसेज सापडताच पटापट चक्रं फिरली अन्...
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
ऑपरेशन टायगरची गरज नाही, आता साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
ऑपरेशन टायगरची गरज नाही, आता साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतात, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Funeral: लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
लाडक्या आजीला शेवटचं पाहून जनाईला अश्रू अनावर; आशा भोसलेंचं पार्थिव पाहून सारेच गलबलून गेले
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
उत्तर प्रदेशात पगारवाढीसाठी सहा कंपन्यातील कामगारांचा एकाचवेळी उद्रेक; पोलिसांची वाहने उलथवून टाकली, कंपनीवर तुफान दगडफेक, महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर
Iran War Live Update: आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
आकाशातून 40 दिवस रक्तरंजित संघर्षानंतर आता पर्शियन समुद्रामध्ये सुद्धा घनघोर संघर्ष सुरू होणार? 'होमुर्झ'वरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Dharashiv Crime News: धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
धाराशिवमध्ये कला केंद्रावर धुमाकूळ, तलवारी नाचवल्या, कला केंद्र फोडलं, धाक दाखवून महिलांचे दागिने, पैसे लुटले
Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'
Share Market Today: बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
बाजार सुरु होताच सेन्सेक्स 1500 अंकांनी कोसळला; निफ्टी सुद्धा 450 हून अधिक अंकांनी खाली
Virat Kohli Meet Sachin Tendulkar MI vs RCB IPL 2026: मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
मिठी मारली, 'गुरु'ने शिष्याची पाठ थोपटली; सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीची भेट, PHOTO
Pandharpur Crime News: पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
पंढरपूरमध्ये पाणीपुरी खाताना तरुणीच्या तोंडावर अज्ञाताने फेकला ज्वलनशील पदार्थ, डॉक्टरांनी एक डोळा वाचवला, पण दुसरा... डॉक्टर काय म्हणाले?
Embed widget