Manoj Jarange: मराठा आमदारांनी काडी लावली आणि वाटोळे झाले, मनोज जरांगेंचा हल्लाबोल
मराठा आमदारांमुळे काडी लागली आणि वाटोळे झाले. आमचे आमदार खासदार जरी एकत्र आले तरी दोन तासात आम्हाला आरक्षण मिळेल असा दावा मनोज जरांगे यांनी चाळीस गाव येथील सभेत केला आहे
चाळीसगाव: मराठा समाजाच्या (Maratha Reservation) एकजुटीमुळे आरक्षण प्रक्रिया सुरु आहे. कुणी कितीही नाही म्हणालं तरी मराठ्यांना ओबीसीतूनच (OBC Reservation) आरक्षण मिळणार, असे वक्तव्य मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) केले आहे. चाळीसगावमधील सभेत मनोज जरांगे बोलत होते. मराठा आमदारांमुळे काडी लागली आणि वाटोळे झाले. आमचे आमदार खासदार जरी एकत्र आले तरी दोन तासात आम्हाला आरक्षण मिळेल असा दावा मनोज जरांगे यांनी चाळीस गाव येथील सभेत केला आहे
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजचा लढा अनेक वर्षांपासून सुरू आहे. समाजाला आरक्षण मिळावे यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष करत आहे. मराठा समाजाच्या एकजुटीमुळे आरक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. मराठा समाजामुळे आरक्षण प्रक्रिया सुरू झाली.
मराठ्यांची पोर संपली तर मराठा समाज संपेल : जरांगे
आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पोरांच्या मदतीला धावून या. श्रीमंत मराठ्यांनी सुद्धा गोरगरिबांच्या लेकरांकडं मागे वळून एकदा बघा कारण तेच तुम्हाला उद्या तारणार आहेत. गरिबांचे पोर श्रीमंताला तारू शकतात. जर जात संपली तर तुम्हाला उद्या विचारणार सुद्धा नाही. प्रत्येकाच्या घरातल्या लेकराला पाठबळाची गरज आहे. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी प्रचंड ताकतीने उठाव केला पाहिजे. मराठ्यांची पोर संपली तर मराठा समाज संपेल.
मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार : जरांगे
मनोज जरांगेनी या वेळी संबोधित करताना पुन्हा एकदा छगन भुजबळांवर टीका केली आहे. मराठ्यांनी त्याला मोठं केलं आणि आज तेच आरक्षण मिळू नये म्हणून उभा राहिला, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली आहे. कोणी कितीही आडवा येऊ द्या मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार, असे जरांगे म्हणाले. आज मराठा समाज चारही बाजूनी घेरला आहे.सरकार आरक्षण सोडून दुसरं काम करत नाही, फक्त आमच्याशी खोट बोलतं आह, असे जरांगे म्हणाले.
जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख नोंदी : जरांगे
एकट्या जळगाव जिल्ह्यात साडेतीन लाख नोंदी मिळाल्या आहेत. लेकरू कोणाच असलं तरी आपलंच लेकरू मोठं होत आहे हे लक्षात ठेवा. शांततेत आंदोलन करायचा आहे, मराठ्यांच्या लेकराला तळपू देऊ नका. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का? असा सवाल देखील मनोज जरांगे पाटील यांनी या वेळी केला.
हे ही वाचा :