एक्स्प्लोर

Maharashtra Bus Accident : लग्नासाठी मुलगी बघितली...पसंतही पडली घरी परतताना काळाचा घाला, इंदूर अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

इंदोर येथून पुन्हा मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे या गावाकडे परतच असताना नर्मदा नदीत बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. अविनाश संजय परदेशी (वय 25) असे मृत तरुणाचं नाव आहे. 

 जळगाव : चार दिवसांपूर्वी मुलगी पाहण्यासाठी तो इंदोर येथे गेला होता. मुलगी पाहिली पसंतही पडली. त्यानंतर काल मानापनाचा कार्यक्रम आटोपून तो आज आपल्या मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पाडळसर येथे परतत होता. मात्र हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. इंदोर येथून पुन्हा मूळ गावी अमळनेर तालुक्यातील पाडळसरे या गावाकडे परतच असताना नर्मदा नदीत (Maharashtra Bus Accident) बस कोसळून झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. अविनाश संजय परदेशी (वय 25) राहणार पाडळसरे तालुका अमळनेर असे मृत तरुणाचं नाव आहे. 

मध्य प्रदेशातील नर्मदा नदीच्या पुलावरून बस कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत अमळनेर तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मृत अविनाश परदेशी या तरुणाचा समावेश आहे. अविनाश हा त्याच्या आईसोबत पाडळसरे या गावात राहत होता. कपडे आणून ठेवणे व ते इस्त्री करून देणे असा त्याचा व्यवसाय आहे यावरच त्याच्या उदरनिर्वाह भागवत होता.

अविनाशचा लहान भाऊ अजय व त्याची मावशी मीना परदेशी हे इंदूरमध्ये राहतात. मावशी व लहान भावाने अविनाशला लग्नासाठी इंदूरमध्ये मुलगी पाहिली होती. ही मुलगी पाहण्यासाठी अविनाश चार दिवसांपूर्वी पाडळसरे येथून इंदोर येथे गेला होता. इंदोरमधील राजेंद्र नगर येथील स्थळ होतो. ती मुलगी अविनाशने बघितली. त्याला ती पसंतही पडली काल रविवारी मानापानाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर आज इंदोर अंमळनेर बसणे अविनाश हा गावी येण्यासाठी बसला. त्याची मावशी व लहान भावाने त्याला बस मध्ये बसवलं. मात्र पुढे काय अनिश्चित घटना घडेल हे कुणालाच माहित नव्हतं. मध्य प्रदेशातील एका पुलावरून बस थेट नर्मदा नदी पात्रात कोसळली. या घटनेत बसमध्ये बसलेल्या अविनाश याचाही मृत्यू झाला.

दरम्यान बसमध्ये बसवल्यानंतर अविनाश याच्या लहान भावाने फोनवरून आई संगीताला अविनाश याला बसमध्ये बसवण्याची माहिती दिली होती.  तसेच बसचा क्रमांकही सांगितला होता. दरम्यान गावात नर्मदा नदीच्या पात्रात अमळनेर आगाराची बस कोसळल्याची माहिती अविनाशची आई संगीताला मिळाली. त्यानुसार संगीता यांनी याबाबत इंदूरमध्ये असलेला अविनाश याचा लहान भाऊ अजयला याबाबत कळवले. अजयने घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता ती खरी निघाली या अपघातात त्याच्या भावाचाही दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अविनाची आई व त्याचे गावातील नातेवाईक हे तातडीने इंदूरकडे रवाना झाले आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra ST Bus Accident : एसटी बस अपघात: मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये द्यावेत,

Maharashtra Bus Accident: मध्य प्रदेशातील अपघातात एसटीच्या चालक-वाहकांसह 13 जणांचा मृत्यू, आठ जणांची ओळख पटली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget