एक्स्प्लोर

Jalgaon: वादळी वाऱ्याने उभा कंटेनरही उलटला, कंटेनरखाली दबून दोघांचा मृत्यू, जळगाव जिल्ह्यातील घटना

Jalgoan Accident: वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्यानंतर उभ्या कंटेनरच्या आडोशाला काहीजण राहिले. वाऱ्यामुळे तो कंटेनर उलटला आणि दोघांचा मृत्यू झाला.

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू आहे. अशातच आज सायंकाळी झालेल्या वादळी पावसात वाऱ्याच्या तडाख्यात उभा कंटेनर उलटल्याने आडोशाला उभे असलेल्या दोन जणांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील चिंचोली गावाजवळ आज  दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जखमी व्यक्तीस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. भोला श्रीकुसूम पटेल, चंद्रकांत वाभळे असे मयत झालेल्या कामगारांचे नावे आहेत. 

जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे. या ठिकाणी बिहार राज्यातील काही मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे. गुरूवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. यावेळी वादळी वारा आणि पावसापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतु वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड उडाले. 

त्यामुळे शेडमधील मजूर हे पटांगणात उभा असलेल्या कंटेनरच्या बाजूला जाऊन उभे राहिले. मात्र वारा एवढा सुसाट होता की उभा कंटेनर उलटला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल, चंद्रकांत वाभळे हे दोघे दाबले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेला अफरोज आलम  हा जखमी झाला. जखमीला तातडीने जिल्हा शाासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. तर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. घटना घडल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget