एक्स्प्लोर

Jalgaon News : जळगावात कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदार भरतीच्या बातमीत तथ्य नाही, जिल्हाधिकाऱ्याचं स्पष्टीकरण

Jalgaon News : "जळगावात तहसीलदार, नायब तहसीलदारांची पदभरती कंत्राटी तत्त्वावर होणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही," असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिलं आहे.

जळगाव : "जळगावात (Jalgaon) तहसीलदार (Tehsildar), नायब तहसीलदारांची (Naib Tehsildar) पदभरती कंत्राटी तत्त्वावर होणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत, त्यात कोणतंही तथ्य नाही. या निव्वळ अफवा आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत," असं स्पष्टीकरण जळगावचे जिल्हाधिकारी (Jalgaon Collector) आयुष प्रसाद यांनी दिलं आहे.

एकीकडे आधीच कंत्राटी पद्धतीने पद भरती करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती, अशातच जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने भरती करणार असल्याची जाहिरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली. परंतु कंत्राटी पद्धतीने तहसीलदार, नायब तहसीलदारांची भरती होणार असल्याची बातमी खोटी असल्याचं तहसीलदार म्हणाले.

जिल्हाधिकारी काय म्हणाले?

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, "जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन शाखेमार्फत ही जाहिरात निघाली होती. अशा प्रकारच्या जाहिराती वेळोवेळी निघत असतात. कोणत्याही प्रकारच्या भूसंपादन प्रक्रियेत आपल्याला अतिरिक्त मनुष्यबळ लागत असते. जे आपण त्या ठराविक कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावरती घेत असतो. यामध्ये आपणास टायपिंगचे काम करणारे डेटा एन्ट्री ऑपरेटर त्याचबरोबर भूसंपादन प्रक्रियेविषयी संपूर्णपणे माहिती असलेले तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. ज्यांना महसूल प्रशासनाच्या भूसंपादन प्रक्रियेचा अनुभव आहे, अशा व्यक्तींचा त्यामध्ये समावेश होतो. यामध्ये या तज्ज्ञ व्यक्तींची निव्वळ कंत्राटी तत्वावर भरती केली जाते. या व्यक्तींना ठराविक कालावधीपुरते कंत्राटी घेतलेले जात असते‌. त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करण्यात येत असते. कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त सहा महिन्याच्या कालावधीसाठी या व्यक्तींची कंत्राटी सेवा घेतली जाते. या कालावधीमध्ये ते भूसंपादनाची प्रक्रियेसाठी प्रशासनाला सहाय्य करतात. या पदावरील व्यक्तींना कोणत्याही प्रकारच्या स्वतंत्र कार्यालय नसते. ते कोणत्याही प्रकारचे स्वतंत्र निर्णय घेत नाहीत. त्यांच्या अंतर्गत कोणतेही कर्मचारी कार्यरत नसतात.

अफवांवर विश्वास ठेवू नका

जळगाव जिल्ह्यात अशी भरती प्रक्रिया याच्या आधीही खूप वेळा झालेल्या आहेत. त्यामध्ये नवीन काही नाही. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, पाटबंधारे, जलसंपदा विभाग अशा विविध विभागांच्या विकास प्रक्रियेसाठी भूसंपादन केले जाते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 2144 भूसंपादन केसेस प्रलंबित आहेत. या केसेस लवकरात लवकर योग्य निर्णय करुन मार्गी लावण्यासाठी काही कालावधीसाठी अतिरिक्त मनुष्यबळ आवश्यक आहे. त्यासाठी ही कंत्राटी भरती केली जाणार आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे.

हेही वाचा

Jalgaon News : काय सांगता! जळगाव जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची भरती, जाहिरात प्रसिद्ध, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 June 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7:00AM : 29 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSunanandan Lele T20 : भारत आणि दक्षिण आफ्रिकेची काय आहेत बलस्थानं ?TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 29 June 2024 : 6 AM: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024: खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
खराब कामगिरी मग काय....; अंतिम सामन्याआधी विराट कोहलीच्या कामगिरीवर सौरव गांगुलीचं मोठं विधान
Anant Ambani Radhika Merchant Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
अनंत-राधिकाच्या लग्नाआधी पार पडणार आणखी एक दिमाखदार सोहळा; वाचाल तर कौतुक कराल...
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
Horoscope Today 29 June 2024 : आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार 'शनीची कृपा'; साडेसातीपासून होईल सुटका, वाचा आजचे राशीभविष्य
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Embed widget