Jalgaon News: शिवसेनेचा नेता रहस्यमयरित्या झाला बेपत्ता; विधानसभेत मिळालेली मोठी जबाबदारी, शेवटचे बँकेच्या सीसीटीव्हीत अन्... राजकारणात खळबळ!
Jalgaon News: धुळे येथून गावाकडे जात असल्याचे सांगून ते निघाले होते, सीसीटीव्हीमध्ये जळगावच्या कोर्ट चौक व बँकेजवळ दिसले होते.

जळगाव: शिवसेना शिंदे गटाचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय लोटन पाटील हे रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय पाटील हे धरणगाव तालुक्यातील दोन गाव येथील रहिवासी असून ते सध्या धुळे येथे वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी गावाकडे जात असल्याचे सांगून ते घरातून निघाले. त्यानंतर ते सीसीटीव्ही फुटेजमध्ये शहरातील एका बँकेतून पैसे काढताना व त्यानंतर कोर्ट चौकाकडे जाताना दिसून आले. दरम्यान, त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. शेवटचे ते जळगाव रेल्वे स्थानकावर अयोध्येच्या रेल्वेत बसताना दिसल्याची माहिती मिळाली असून, त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान संजय लोटन पाटील रहस्यमयरित्या बेपत्ता झाल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. मात्र, आता त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, संजय पाटील यांना शेवटचे जळगाव शहरातील एका बँकेच्या एटीएममधून पैसे काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले गेले होते. त्यानंतर ते कोर्ट चौकाकडे जाताना शेवटचे दिसले होते. जळगाव रेल्वे स्थानकावर अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसले असावेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, यानंतर त्याच्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही. त्यांचे मोबाईल बंद असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे ते निकटवर्तीय
बेपत्ता झालेले संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात त्यांचं मोठं नाव होतं. मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी असलेले संजय पाटील सध्या धुळ्यात वास्तव्यास होते. काही दिवसांपूर्वी ते धुळ्याहून गावाकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. जळगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांचा तपास सुरू
जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संजय पाटील अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेत बसल्याची शक्यता समोर आली आहे. मात्र, त्यानंतर त्यांचा पत्ता लागलेला नाही. या प्रकरणाने स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.






















