Jalgaon Gold News : खरेदीचा 'सोनेरी' मुहूर्त; दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर जळगावच्या सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Jalgaon Gold News : दसऱ्याच्या निमित्ताने जळगावच्या सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते.
Jalgaon Gold News : साडेतीन मुहू्तांपैकी एक दसरा (Dussehra 2022) सणाच्या निमित्ताने जळगावच्या (Jalgaon) सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी उत्तम मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्याची खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच धन संपत्तीचा लाभ मिळतो अशी अनेकांची श्रद्धा आहे. याच निमित्ताने जळगावात आज सकाळपासून ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आहे.
गेल्या दोन वर्षांचा काळ पाहता कोरोनाच्या (Covid-19) महामारीमुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. यावर्षी मात्र, कोरोनाचे निर्बंध हटविण्यात आले असल्याने व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात हजार रूपयांची घसरण झाल्याने ग्राहकांना मात्र हा मुहूर्त अधिकच फायदेशीर ठरला आहे. जळगावच्या सुवर्ण नगरीत ग्राहकांची सोने खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे.
ग्राहकांमध्ये मोठा उत्साह :
दरम्यान, ग्राहकांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली असता ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. एका ग्राहकांनी असं म्हटलं की,'दसऱ्याच्या निमित्ताने आमच्या घरी सोने खरेदी करण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. या मुहूर्तावर सोने खरेदी करणे बरकत देणारे मानले जाते.' तर दुसऱ्या ग्राहकांनी असं म्हटलं आहे की, ही एक चांगली गुंतवणूक देखील असल्याने आम्ही आजचा मुहूर्त साधण्यासाठी आलो आहोत.' अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत.
तर, आजची सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त असल्याने अनेक ग्राहक आजच्या दिवशी सोने खरेदीसाठी नेहमीच गर्दी करत असतात. आज सकाळपासूनच ग्राहकांनी गर्दी केली असल्याची प्रतिक्रिया रतनलाल बाफना ज्वेलर्सचे संचालक सुशील बाफना यांनी यावेळी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :