एका बाईकवरुन चौघांचा जीवघेणा प्रवास; भरधाव वेगातील कारने होत्याचं नव्हतं केलं, अख्खं कुटुंब संपलं
अख्ख कुटुंब गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव शहराकडे पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत हा अपघात झाला आहे.
जळगाव: भरधाव चारचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर ग्रामस्थांकडून रास्तारोको करत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अपघातात अख्ख कुटुंब गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जळगाव शहराकडे (Jalgaon Accident) पाचोराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव चारचाकीने दिलेल्या धडकेत हा अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोराकडे जाणाऱ्या एका भगधाव चार चाकीच्या धडकेत हा अपघात झाला आहे. या मध्ये चौघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये तीन शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. घटनेनंतर पोलीस पाटील आल्यानंतर वातावरण चिघळल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. रास्तारोको कर त वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. शिरसोली येथील रहिवासी असलेल्या राणी सरदार चव्हाण या मुलगा सोहम( वय 7 वर्षे), सोहमेश (वय – 4 वर्षे) आणि 16 वर्षीय भाचा असे चौघे इलेक्ट्रिक दुचाकीने शिरसोलीकडे जात होते. रामदेववाडी गावाच्या पुढे घाट मार्गावर जळगावकडून येत असलेल्या कारने त्यांना जोरदार धडक दिली
दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू
अपघात इतका भीषण होता की दुचाकी चक्काचूर झाली असून चारचाकी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेचा कंपाऊंड तोडून आत शिरली. अपघातात दुचाकीवरील चौघांचा जागीच मृत्यू झाला. वातावरण अधिकच चिघळल्याने दगडफेक देखील झाली. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह आरसीपी प्लॅटून आणि पोलिसांचा मोठा ताफा पोहचला आहे
संतप्त जमावाकडून दगडफेक, दोन पोलीस कर्मचारी जखमी
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. संतप्त जमावाने रास्ता रोको केला. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. संतप्त जमावामुळे चार तास मृतदेह घटनास्थळीच होता. घटनास्थळी परिस्थिती एवढी चिघळली होती की जमावाने दगडफेक केल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर केली होती. या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. काही वेळानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले. दगडफेकी प्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. या अपघाताला वाहन चालक जबाबदार असल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा :