एक्स्प्लोर

Jalgaon : जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट; बदली झाल्याने घरातील साहित्य विकायचं आहे असं सांगत फसवणूक

Jalgaon Crime : आयएएस अधिकारी असलेल्या अमन मित्तल यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

जळगाव: काहीच दिवसांपूर्वी जळगावहून बदली झालेल्या जिल्हाधिकारी अमन मित्तल  (IAS Aman Mittal) यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट (Fake Facebook Account) तयार करून त्यावरून घरगुती साहित्य विक्री करावयाचे सांगून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमन मित्तल यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात (Jalgaon Cyber Crime Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून अमन मित्तल (IAS Aman Mittal Fake Facebook Account) हे कार्यरत होते. गेल्या दोन दिवसांपूर्वीच त्यांची प्रशासकीय बदली झाली आहे. दरम्यान, अमन मित्तल यांच्या नावाने सायबर चोरट्याने फेसबुकवर बनावट खाते तयार केले. त्यावर स्वत: अमन मित्तल असल्याचे भासवून बदली झाल्यामुळे घरगुती सामान विक्री करावयाचे असल्याचे पोस्ट संबंधिताने फेसबुक वरून टाकली. 

दरम्यान, बनावट फेसबुक तयार करण्यात येवून त्या माध्यमातून घरगुती साहित्य विक्री केले जात असल्याच्या या पोस्टबाबत अमन मित्तल यांच्या मित्रांनी त्यांना कळविले. त्यानंतर कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फसवणूक करत असल्याची खात्री झाल्यावर तत्कालिन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ऑनलाईन पद्धतीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच प्रकारबाबत फोनवरून जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना कळविले. तसेच संबंधित बनावट फेसबुक खातं आणि त्यावरून फसवणूक संदर्भातील मेसेजचे फोटो अमन मित्तल यांनी पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांना व्हॉटसटॲपवरून पाठविले आहे. 

सायबर चोरट्याने घरगुती सामान विक्री असल्याच्या पोस्टसोबतच त्याचा पेटीएम क्रमांक सुद्धा टाकला होता. याच पेटीएम खात्यावर पैसे जमा करण्यासाठी स्वत: बँक अकाऊंट नंबरसह संपूर्ण माहिती आणि पेटीएमचा क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी सुद्धा पाठविला होता. या संबंधित माहितीवरून बनावट फेसबुक खातं (IAS Aman Mittal Fake Facebook Account) तयार करणाऱ्याचे नाव गोवर्धन लाल साहू असं असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान, या प्रकाराला पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दुजोरा दिला आहे. ऑनलाईन पद्धतीने अमन मित्तल यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असल्याची माहिती दिली आहे. तसेच या प्रकारात अद्याप कुणाचीही फसवणूक झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले

व्हिडीओ

Anjali Damania : नावाला पार्थ, दादांचा स्वार्थ? मुंढवा जमीन पकरणी दमानियाचे नवे आरोप Special Report
Leopard Terror : अचाट सल्ले ऐका, बिबट्याला रोखा! बिबट्याचा धुमाकूळ, अधिवेशनात वादळ Special Report
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Cash Bomb Politics : राजकीय बंडलबाजी, महापुरुषांवरुन टोलेबाजी; स्तुती करताय की टीका Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : 'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
'तुमच्या हिशोबाने संसद चालणार नाही'; राहुल गांधींच्या प्रश्नावर अमित शाह भडकले, लोकसभेत शाब्दिक वाद
Maharashtra : जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
जमिनीच्या एनए अटीनंतर आता ‘सनद’ची अटही रद्द, बाजारमूल्यानुसार प्रीमियमचे दर निश्चित
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
शाही सोहळ्यात ठाकरे बंधूंचा जलवा, आदित्यची 'काका'ला जादू की झप्पी, अमितशीही गप्पा; स्नेहभोजनाचेही फोटो
Sharad Pawar : शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी 'पॉवर शो'; गौतम अदानी, अजित पवारांसह देशभरातील बडे असामी '6 जनपथ'वर एकवटले
Eknath Shinde : घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
घोडबंदर रस्ता रुंदीकरणासाठी वनविभागाचा अडथळा लवकर दूर करा; एकनाथ शिंदेंची सूचना
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले, कारण समोर
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार गडगडला, गुंतवणूकदारांचे एकाच दिवसात 1.09 लाख कोटी बुडाले
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
हायकोर्ट म्हणाले, मुंढवा प्रकरणातील FIR मध्ये पार्थ पवाराचं नाव का नाही? देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Gadchiroli Crime: परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
परिचारिकेला शरीर सुखाची मागणी, आरोग्य अधिकाऱ्यावर कारवाई; मुंबईतून आला निलंबनाचा आदेश
Embed widget