एकनाथ शिंदेंनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसते - गुलाबराव पाटील
Gulabrao Patil on Sanjay Raut: अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत, मात्र आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
Gulabrao Patil on Sanjay Raut: अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत, मात्र आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. यावेळळी गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत सुद्धा आमच्यावर टीका करत आहेत, महापुरुषांबद्दल काहीतरी बोलता येतं, मात्र मी खोलात जाणार नाही. एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात ठेवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसता, आडवा पडला असता, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. संजय राऊतांना जी 41 मते पडले ना ते असं केल्यामुळे पडले हे सांगताना गालावर हात ठेवून मंत्री गुलाबराव पाटील यांनी नक्कल करत संजय राऊत यांच्यावर घणाघात केला आहे.
लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली, यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनोगतात म्हणजे गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर तसेच संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा हे मी विधानसभेत ओवेसीच्या *** ना सांगितलं...:- मंत्री गुलाबराव पाटील
आम्ही कोणत्या धर्म कडे वाकड्या नजरेने बघत नाही, पण आमच्या धर्माकडे कोणी वाकड्यांना नजरेनं बघत असेल तर आम्ही काही गांधींजी नाही की.. या गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायचा असं ही मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितले. इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा हे मी विधानसभेत ओवेसीच्या *** ना सांगितल्याचंही म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी ओवेसी यांच्यावर एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली.
चार महिन्यापूर्वीच गाडी बदलली -
आपल्याच आशीर्वादाने मंत्री झालो आहे हे सांगताना म्हणूनच मी चार महिन्यापूर्वी गाडी बदलली. इस मार्ग की सभी लाईन व्यस्त..थोडी देर बाद डायल करे..आणि सिधा गुवाहाटी...अशी आपल्या शैलीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली. आमच्यावर खूप टीका झाली. मात्र बाळासाहेबांचे मूळ जे बाहेर जात होत ते सुटू नये, त्यासाठीच बाहेर पडलो व आम्ही आज तुमच्यासोबत असल्याचेही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केल.